लॉकडाऊनमध्ये रणवीर सिंहनं बनवली बॉडी, टायगरनं सुद्धा केली ‘कमेंट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   रणवीर सिंह आपल्या भूमिकांसाठी खास फिजिकल ट्रान्सफॉर्मेंशन करत आला आहे. त्याने फिल्म सिंबासाठी बॉडी बनवली होती, तर पुढील फिल्म गली बॉयमध्येे तो खुपच स्लिम ट्रिम दिसला. रणवीर सतत आपल्या बॉडीला पूश करत आला आहे आणि लॉकडाऊनमध्ये सुद्धा तो आपल्या फिटनेसला वेगवेगळ्या स्तरावर घेऊन गेला.

रणवीरने इंस्टाग्रामवर एक छायाचित्र शेयर केले आहे, ज्यामध्ये तो सुपरफिट दिसत आहे. रणवीरच्या छायाचित्रावर अनेक फॅन्सने सुद्धा कमेंट्स केल्या आहेत. तर आपल्या फिटनेससाठी प्रसिद्ध टायगर श्रॉॅफने सुद्धा रणवीरच्या बॉडीचे कौतूक केले आहे आणि या फोटोवर फायर इमोजी बनवला आहे.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे तर रणवीर सिंहच्या 83 ची रिलिज डेट 10 एप्रिल होती. परंतु कोरोनाचा कहर सुरू असल्याने फिल्मची रिलिज डेट पुढे ढकलली आहे. ही फिल्म कबीर खान यांनी डायरेक्ट केली आहे आणि फिल्ममध्ये दीपिका पदुकोणसुद्धा काम करत आहे. याशिवाय फिल्ममध्ये ताहिर राज भसीन, साकीब सलीम आणि एमी विर्कसारखे कलाकार दिसणार आहे.

रणवीरने या फिल्ममध्ये कपिल देवची भूमिका केली आहे. रणवीरच्या जवळ याच्याशिवाय करण जोहरचा प्रोजेक्ट तख्त आहे. या फिल्ममध्ये तो विक्की कौशल, करीना कपूर खान, आलिया भट्ट, भूमि पेडणेकर, अनिल कपूरसारख्या कलाकारांसोबत दिसणार आहे. रणवीर सिंह याशिवाय यशराज बॅनरखाली कॉमेडी फिल्म जयेशभाई जोरदारमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात रणवीसोबत शालिनी पांडे, रत्ना पाठक, बोमन ईरानी आणि दीक्षा जोशी सारखे कलाकार काम करणार आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like