दीपिकाच्या चौकशीदरम्यान उपस्थित राहणार रणवीर सिंह ? खास परवानगीसाठी NCB कडे केलं अ‍ॅप्लीकेशन

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणाचा तपास अमली पदार्थ विरोधी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो करत आहे. या तपासात बॉलिवूडमधील अनेक मोठी नावे समोर आली असून, या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली. त्यानंतर एनसीबीकडून करण्यात आलेल्या चौकशीत अभिनेत्री दीपिका पादुकोण , सारा अली खान, श्रद्धा कूपर आणि नकुल प्रीत सिंह या बड्या अभिनेत्रींची नावे उघडकीस आली आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला तपासात दीपिका पादुकोण आणि तिची टॅलेंट मॅनेजर करिश्मा प्रकाश यांचे ड्रग्ज बाबत चॅट सापडले आहे. त्यानंतर दीपिकाला एनसीबीने समन्स बजावला असून तिला २५ सप्टेंबरला चौकशीसाठी बोलवले होते. पण सूत्रांनी दिलेल्या वृतानुसार दीपिका २६ सप्टेंबरला चौकशीसाठी समोर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दीपिकाच्या चौकशीवेळी त्याठिकाणी उपस्थित राहण्याची परवानगी तिच्या पतीने म्हणजे अभिनेता रणवीर सिंग याने एनसीबीकडे मागितली आहे.

त्यासाठी रणवीर सिंगने एनसीबीकडे अर्ज केला आहे. त्यात त्याने म्हटले की, दीपिकाच्या चौकशीवेळी त्याने तिथे असणे गरजेचे आहे कारण तिला कधी कधी पॅनिक अटॅक येतात आणि भीती वाटते. म्हणून त्याला दीपिकासोबत राहण्याची परवानगी मिळावी. तो कायद्याशी बांधील नागरिक आहे आणि त्याला माहिती आहे तो चौकशीदरम्यान तिथे उपस्थित नाही राहू शकत. मात्र, तरीसुद्धा तो एनसीबीकडे विनंती करत असल्याचं माहिती सूत्रांकडून मिळाली. दरम्यान, या अर्जाबाबत एनसीबीकडून अद्याप कोणताही निर्णय जाहीर करण्यात आला नाही.

अभिनेत्री शर्लिन चोप्राने, दीपिका पादुकोण ड्रग्ज घेत असल्याने डिप्रेशनमध्ये गेली होती, बॉलिवूडमधील ९५ टक्के लोक ड्रग्ज घेत असल्याचा खुलासा केला होता. शर्लिन ने सांगितलं, मी ज्या पार्टीत गेले होते तेथे बहुतांश जण कोकेन घेत होते. त्या सगळ्यांची नावे मी एनसीबीकडे सादर करणार आहे. बॉलिवूडची कोणतीही पार्टी ड्रग्ज शिवाय होत नसून सारा, दीपिकाची चौकशी केली असता खूप मोठी नावे उघडकीस येतील, असेही तिने म्हटलं.