प्रसिध्द ‘कोरियोग्राफर’च्या पायालाच घट्ट धरल रणवीर सिंहनं, फोटो व्हायरल

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – बाॅलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग आपल्या दमदार आणि मजेदार शैलीसाठी ओळखला जातो. रणवीर बॉलिवूडमधील एक सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ओळखला जातो आणि त्याच्या भूमिका आणि फॅशन सेन्सची चर्चा सातत्याने होत असते. रणवीर साकारत असलेल्या प्रत्येक पात्राला अक्षरशः सजीव करण्यासाठी खूप मेहनत घेत असतो. तरी यासह सेटवर त्याच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांशीही खूप मजा मस्ती करत असतो. आपल्या सर्वांना रणवीरच्या मस्ती आणि नटखटपणा संबंधित फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळतात. रणवीरचा असाच एक फोटो पुन्हा समोर आला असून त्यात तो कोरिओग्राफर श्यामक डावर यांच्यासोबत मस्ती करताना दिसत आहे.

इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या नव्या फोटोमध्ये रणवीर सिंग कोरिओग्राफर श्यामक डावर यांचे पाय धरतो आहे आणि जाण्यापासून रोखत आहे. यानंतर श्यामक कपाळावर हात मारून घेत आहे. फोटोत रणवीरचे कपडेदेखील पाहण्यासारखे आहेत. त्याने अतिशय थंड ब्लॅक जीन्ससह केशरी रंगाचे जाकीट घातले आहे आणि अतिशय अनोखे सनग्लासेस घातले आहेत.

View this post on Instagram

#ranveersingh with #shiamakdavar 😁😎🤘😄

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

दरम्यान, काही काळापूर्वी रणवीर सिंग करण जोहर आणि आलिया भट्ट सोबत तख्त चित्रपटाच्या शूटिंगच्या सत्रामध्ये दिसला होता. फिल्म तख्त हा एक बहुचर्चित चित्रपट असून यामध्ये रणवीर, आलियासोबत विक्की कौशल, भूमी पेडणेकर, जाह्नवी कपूर, करीना कपूर आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत आहेत.

रणवीर सिंह दिग्दर्शक कबीर खान यांच्या ८३ या चित्रपटातही दिसणार आहे. चित्रपटात तो माजी क्रिकेटर कपिल देवची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात त्यांची पत्नी दीपिका पादुकोण कपिलची पत्नी रोमी देवच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा १९८३ मध्ये भारताच्या पहिल्या क्रिकेट विश्वचषक विजयावर आधारित आहे. हा चित्रपट १० एप्रिल, २०२० रोजी प्रदर्शित होईल.

You might also like