मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या हटके स्टाईलने व लूकने साऱ्यांचे लक्ष वेधणारा बॉलीवूडचा बाजीराव अभिनेता रणवीर सिंगने (Ranveer Singh) आता थेट हॉलीवूडमध्ये (Hollywood) झेप घेतली आहे. बॉलीवूडचे अनेक सितारे जागतिक पातळीवर काम करण्यासाठी हॉलीवूडचे प्रोजेक्ट घेत आहे. यामध्ये रणवीरची पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone), प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra), आलिया भट्ट (Alia Bhatt), इरफान खान (Irrfan Khan), अनिल कपूर (Anil Kapoor), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांसारख्या अनेकांनी हॉलीवूडमध्ये काम केले आहे. या यादीमध्ये आता रणवीर सिंगचे (Ranveer Singh) नाव दाखल झाले आहे.
विल्यम मॉरिस एंडेव्हर William Morris Endeavor (WME) नावाच्या आंतरराष्ट्रीय टॅलेंट एजन्सीसोबत (International Talent Agency) रणवीर सिंगने नुकताच करार केला आहे. यामुळे त्याचा हॉलीवूड प्रवासाला प्रारंभ हेणार आहे. WME ही एजन्सी अनेक मोठ्या सुपरस्टारला रिप्रेझेट्स करते ज्यामध्ये गल गडोट (Gal Gadot), एम्मा स्टोन (Emma Stone), ओप्रा (Oprah) आणि चार्ली पेरॉन (Charlize Perron) यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्टार्सचा समावेश आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने देखील विलियन मॉरिस एंडेव्हर सोबत २०२१ साली करार केला होता. आता आलियानंतर रणवीरने जागतिक प्रतिनिधित्वासाठी WME सोबत साइन केले आहे.
या करारापूर्वी रणवीरने सर्कस (Cirkous) आणि जपेशभाई जोरदार (Jayeshbhai Jordaar) या चित्रपटामध्ये कामे केली.
मात्र हे दोन्ही चित्रपट बॉक्सऑफिसवर काही खास कामगिरी करू शकले नाही.
येत्या जुलैमध्ये रणवीर आणि आलियाचा रॉकी और रानी की प्रेम कहानी
(Rocky Aur Rani Ki Prem Kahani) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
यापूर्वी रणवीर (Ranveer Singh) आणि आलियाने झोया अख्तर (Zoya Akhtar)
दिग्दर्शित गली बॉय (Gully Boy) मध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली होती आता ते
पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत.
Web Title : Ranveer Singh | Ranveer Singh Leaps Straight into Hollywood; Contracts with international talent agencies
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Sara Ali khan | सारा अली खान झाली महाकालच्या भक्तीमध्ये तल्लीन; मात्र नेटकऱ्यांनी धरले धारेवर
UPI Payment Update | यूपीआय पेमेंटबाबत RBI ची नवीन घोषणा; आता इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट