…म्हणून रणवीर सिंगला व्हायचंय बॉलिवूड इंडस्ट्रीचा ‘लिडर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रणवीर सिंग बॉलिवूडमधील खूपच एनर्जेटीक, टॅलेंटेड आणि पॉप्युलर अ‍ॅक्टर आहे. रणवीर सिंगचं अ‍ॅक्टींग आणि सिनेमावर विशेष प्रेम आहे. तुम्हाला माहिती आहे का, रणवीर सिंगला फिल्म इंडस्ट्रीचा लिडर व्हायचे आहे. एका मुलाखतीत त्याने ही इच्छा बोलून दाखवली आहे.

मुलाखतीत बोलताना रणवीर सिंग म्हणाला की, “माझं सिनेमा आणि इंडस्ट्रीवर खूप प्रेम आहे. मला फिल्म इंडस्ट्रीचा लिडर आणि चॅम्पियन व्हायचं आहे. मला वाटतं की, हिंदी सिनेमांचा बिजनेस अधिक चांगला आणि मोठा व्हावा. त्यामुळे मी फिल्म इंडस्ट्रीसाठी कोणतंही योगदान देऊ शकत असेल तर माझ्यासाठी ही आनंदाची बाब आहे.”

रणवीरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सध्या तो आगामी सिनेमा ८३ च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. १९८३ सालच्या क्रिकेट वर्ल्डकपमधील भारताच्या विजयाची कहाणी यात दाखवली जाणार आहे. यात रणवीर लेजेंडरी क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. या सिनेमात त्याच्या सोबत त्याची पत्नी दीपिका पादुकोणही दिसणार आहे. लग्नानंतर रणवीर आणि दीपिका यांचा हा पहिला सिनेमा आहे. १० एप्रिल २०२० रोजी हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत रिलीज होणार आहे.

View this post on Instagram

Extra gluten, please

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

 

आरोग्यविषयक वृत्त –

 

 

Loading...
You might also like