‘गली बॉय’नंतर पुन्हा एकत्र दिसणार ‘रणवीर-आलिया’ ! 2021 मध्ये सुरू होणार शुटींग

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार रवणीर सिंग (Ranveer Singh) आणि आलिया भट (Alia Bhatt) यांनी गली बॉय (Gully Boy) सिनेमात एकत्र काम केलं. सिनेमाला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता अशी माहिती आहे की, फिल्ममेकर करण जोहर (Karan Johar) ही जोडी पुन्हा एकत्र आणणार आहे. पुढील वर्षात (2021) याची शुटींग सुरू आहे. अद्याप सिनेमाबद्दल जास्त काही माहिती समोर आलेली नाही.

एका इंग्रजी वृत्तानुसार, आलिया आणि रणवीर दोघंही आपापल्या हातातील प्रोजेक्ट संपवल्यानंतर यावर काम सुरू करणार आहेत. आधी त्यांचं 25 दिवसांचं वर्कशॉप असेल. रणवीर आणि आलिया दोघंही याचा भाग असतील.

जर सर्व काही सुरळीत राहिलं तर चाहत्यांना पुढील वर्षातच रणवीर आणि आलिया ही जोडी पडद्यावर एकत्र काम करताना दिसेल. गली बॉय मध्ये या जोडीचं खूप कौतुक झालं होतं. आता पुन्हा ही जोडी एकत्र दिसली तर किती धमाल करते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

रणवीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो 83 या आगामी सिनेमामध्ये दिसणार आहे. सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर 1983 सालच्या क्रिकेट वर्ल्डकपमधील भारताच्या विजयाची कहाणी या सिनेमात दाखवली जाणार आहे. सिनेमात रणवीरनं लिजेंडरी क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा 10 एप्रिल 2020 रोजी रिलीज होणार होता परंतु लॉकडाऊनमुळं सिनेमाची रिलीज टाळण्यात आली. याशिवाय तो रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी सिनेमातही काम करताना दिसणार आहे. त्याच्याकडे जयेशभाई जोरदार हा सिनेमाही आहे.

आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र या सिनेमात काम करताना दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत आहे. या सिनेमाच्या निमित्तानं आलिया-रणबीर पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. याशिवाय आलिया करण जोहरच्या तख्त सिनेमातही दिसणार आहे. इतकंच नाही तर तिच्याकडे गंगुबाई काठियावाडी हा सिनेमादेखील आहे.