‘८३’ चित्रपटातील रणवीर सिंहचा ‘रेट्रो’ लुक व्हायरल…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवूड अ‍ॅक्टर रणवीर सिंहचा ‘८३’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. १९८३ च्या क्रिकेट वर्ल्डकप विजयावर आधारित ‘८३’ हा चित्रपट सध्या सगळ्यांच्या चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये त्यावेळेसचे कॅप्टन कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंह करणार आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटामधील रणवीर सिंहचा एक फोटो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. हा फोटो रणवीर सिंहने सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि या फोटोमध्ये रणवीर सिंह रेट्रो लुकमध्ये दिसत आहे.

आपल्या भारताच्या इतिहासामध्ये २५ जून १९८३ ही तारीख सुवर्ण अक्षरामध्ये कोरली गेली आहे. भारतीय संघाने लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर क्रिकेट वर्ल्डकप जिंकला होता. त्यामुळे ही विजयगाथा लवकरच ’८३’ मधून उलगडली जाणार आहे. या चित्रपटासाठी रणवीर सिंह सोबत संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेत आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सिंह कपिल देव यांची भूमिका साकारणार आहेत त्यामुळे रणवीर सध्या कपिल देव यांच्याकडे क्रिकेटचे धडे शिकत आहेत. आणि कपिल देव स्वतः त्याला क्रिकेटमधील गोष्टी समजून सांगत आहे.

रणवीर ने त्याचा नवा लूक शेअर करताना त्याच्या त्या लूकला ‘रेट्रो लुक’ असे नाव दिले आणि फोटो सोशल मीडिया वर शेअर केला. विशेष म्हणजे या फोटोमध्ये रणवीर कपिल देव यांच्यासारखा दिसत आहे. यावरून असे दिसून येते कि रणवीर कपिल देव यांच्या खेळाकडे आणि अभिनयाकडे लक्ष देत नसून त्यांच्या राहणीमानावर लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे.

१९८३ चा क्रिकेट वर्ल्डकप भारतीय क्रिकेट टीमने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली जिंकला आहे. या चित्रपटात कपिल देव यांची मुलगी आमिया दिग्दर्शनात पाऊल टाकते आहे. ’८३’ ची टीम शूटिंग करिता लंडनसाठी १५ मे रोजी जाणार आहे.

View this post on Instagram

रेट्रो

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

Loading...
You might also like