‘गोल्डन’ आऊटफिटमध्ये रणवीरचा लुक पाहून ‘हैराण’ झाले फॅन्स, म्हणाले – ‘इंडियन लेडी गागा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा एनर्जेटीक अ‍ॅक्टर रणवीर सिंग नेहमीच आपल्या अतरंगी फॅशन सेन्समुळे चर्चेत येत असतो. डेली लाईफ असो किंवा इव्हेंट असो किंवा मग प्रमोशन असो रणवीर आपल्या लुकमुळे चर्चेत असतो. जास्त करून त्यांचे एअरपोर्ट लुक जास्त चर्चेत आले आहेत. पुन्हा एकदा असंच काहीसं झालं आहे की, रणवीरनं आपल्या ड्रेसमुळे सर्वांनाच हैराण केलं आहे.

नुकताच रणवीर आपल्या प्रिंटेंड आऊटफिटमुळे चर्चेत आला होता. यानंतर आता तो पुन्हा तो चमचम करणाऱ्या ड्रेसमुळे चर्चेत आला आहे. नुकताच रणवीर गोल्डन सूटमध्ये मुंबईच्या बाहेर पडताना दिसला. त्याच्या हातात एक बूमबॉक्सही होता. गोल्डन सूटसोबत त्यानं ब्लॅक हाय नेक आणि कॅप घातली होती. सोबतच त्यानं ब्लॅक चष्माही घातला होता. रणवीर या आऊटफिटमध्ये खूपच शाईन करत होता.

https://www.instagram.com/p/B8nJC-Onuk6/

रणवीरचा हा लुक पाहून लोकांना झटकाच बसला. अनेकांनी त्याला चॉकलेटचा रॅपर ते एलियन देखील म्हटलं आहे. एकानं तर त्याला इंडियन लेडी गागा म्हटलं आहे. अनेकजण त्याच्या या फोटोंवर कमेंट करताना दिसत आहे. एकानं म्हटलं की, चंद्रावर जाण्याची तयारी केली आहे.