‘ड्युरेक्स’ने रणवीर-दीपिकाला दिल्या अशा काही हटके शुभेच्छा

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – लग्न झालं की सगळेच नवीन जोडप्याला शुभाशिर्वाद देतात. बऱ्याचदा या शुभेच्छा खूपच हटके असतात. काही वेळेस या शुभेच्छा विचित्र किंवा विनोदीही असू शकतात. असंच काहीसं दीपिका आणि रणवीरला आलेल्या शुभेच्छांच्याबाबतीत घडलं आहे. अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी नुकतीच विवाहबद्ध झाली आहे. पारंपरिक कोंकणी पद्धतीने दीप- वीर विवाहबद्ध झाले आणि त्यानंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. इटलीतल्या लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी राजेशाही थाटात हा विवाहसोहळा पार पडला. करण जोहर, कपिल शर्मा अशा बऱ्याच सेलिब्रिटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. परंतु एक प्रकारे आलेल्या हटक्या शुभेच्छा सोशल मीडियावर चांगल्याच पसरताना दिसत आहेत. कंडोमचा ब्रँड असलेल्या ‘ड्युरेक्स’ कंपनीने दीप-वीरला हटके पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. ‘ड्युरेक्स’ची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

‘ड्युरेक्स’ने रणवीर- दीपिकाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. एका ट्विटरच्या माध्यमातून या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. रणवीर सिंग ‘ड्युरेक्स’चा ब्रँड अॅम्बेसेडर होता. त्यामुळे ट्विटरद्वारे ‘ड्युरेक्स’ने शुभेच्छा दिल्या. महत्त्वाचं म्हणजे या  या शुभेच्छा देताना आपल्या ब्रँडची जाहिरातही त्यांनी अतिशय हुशारीनं केली आहे. कंपनीची जाहिरात करण्यात चांगली युक्ती लढवली आहे. इतकंच नाही तर ‘ड्युरेक्स’ने याआधी विराट कोहली-अनुष्का शर्मा, सोनम कपूर-आनंद अहुजा या जोड्यांनादेखील अशाच हटके शुभेच्छा दिल्या होत्या. फक्त ड्युरेक्सनेच नाही तर ‘अमूल’ या ब्रँडनेही  रणवीर-दीपिकाला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याही दखल घेण्याजोग्याच आहेत.

कोंकणी पद्धतीनं लग्न पार पडल्यानंतर दीपिका रणवीर हे दोघंही पुन्हा एकदा सिंधी पद्धतीनं लग्नाच्या बेडीत अडकल्याचे समजत आहे. या लग्नसोहळ्यात नवरदेव रणवीरने सी- प्लेनमधून ग्रँड फिल्मी एण्ट्री केल्याचे समजत आहे.