भाजपच्या मेळाव्यास रावसाहेब दानवेंची ‘दांडी’, फोटो न लावल्यानं ‘नाराज’ ?

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – औरंगाबाद महापालिकेची निवडणूक लवकरच होणार असून, सर्वच पक्ष या निवडणुकीसाठी मेहनत घेताना दिसून येत आहेत. त्या निमित्ताने औरंगाबाद मध्ये भाजपचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे हजर राहिले नाहीत. कायक्रमस्थळी त्यांचा फोटो नसल्यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात आहे.

रावसाहेब दानवे यांचा फोटो नसल्याचे लक्षात येताच आयोजकांनी कार्य्रक्रम चालू असतानाच हरिभाऊ बागडे आणि दानवे यांचा फोटो चिकटवला. कार्यक्रमाच्या शेवटी हरिभाऊ बागडे उपस्थित राहिले, परंतु दानवे उपस्थित राहिले नाहीत. भाजपच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चौफेर फटकेबाजी केली. हा कार्यकर्ता मेळावा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केला होता.

शिवसेनेवर जोरदार टीका
औरंगाबाद शहराची वाट ही शिवसेनेने लावली. शहरामधील कोणतीही समस्या सोडवली नाही. रस्ते नीट नाहीत, महिला रोजगार, महिलांसाठी स्वछता गृहांची बांधणी नाही, या सगळ्यांच मुद्द्यांवरून चंद्रकांत पाटलांनी सेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले.