राज्यातील युतीच्या ‘या’ ६ नेत्यांची केंद्रीय मंत्रिपदासाठी वर्णी ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपने बाजी मारली भाजपच्या कार्यकर्त्यांकडून, नेत्यांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मात्र आता भाजपच्या खासदारांना मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. नवीन केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या वतिने संसदेतील सेनेचे गटनेते अनिल देसाई किंवा नवीन चेहरा म्हणून राहुल शेवाळे यांची नावे पुढे येत आहेत. याबरोबरच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेव दानवे यांच्या नावाचाही केंद्रीय मंत्रिपदासाठी विचार सुरु आहे.

सध्या भाजपच्या वतीने विद्यमान मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल , प्रकाश जावडेकर यांच्याबरोबरच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नावाचाही केंद्रीय मंत्रिपदासाठी विचार सुरु आहे. सध्याच्या मंत्रिमंडळात राज्यातून भाजपचे पाच, तर शिवसेनेचा एका मंत्री होता. त्यापैकी शिवसेनेचे अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांचा यंदाच्या निवडणुकीत पराभव झाला. तर नितीन गडकरी आणि सुभाष भामरे यांचा विजय झाला आहे. पीयूष गोयल हे रेल्वे, कोळसा उद्योगमंत्री होते. 2017 पासून राज्यसभेवर त्यांची निवड झाली. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी सोशल मीडियाची धुरा सांभाळली.

अनिल देसाई हे २०१२ पासून राज्यसभेचे सदस्य आहेत. शिवसेनेचे विद्यमान गटनेते आहेत. २००२ पासून राष्ट्रीय सचिव म्हणून, २०१८ पासून राज्यसभेवर, तर २०१४ मध्ये त्यांची मंत्रिपदासाठी पक्षातर्फे शिफारस करण्यात आली होती. राहुल शेवाळे हे दक्षिण-मध्य मुंबईमधून दुसर्‍यांदा विजयी झाले आहेत.

पाचवेळा रावसाहेब दानवे लोकसभेवर विजयी झाले आहेत. २०१४ साली त्यांना ग्राहक संरक्षण, अन्‍न व पुरवठा मंंत्रिपद, देण्यात आले होते. मात्र २०१५ मध्ये मंत्रिपद सोडून दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा संभाळली आहे. आता त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची आशा आहे. प्रकाश जावडेकर यांची २०१४ मध्ये माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री २०१६ पासून मनुष्यबळ विकासमंत्री २०१८ मध्ये त्यांची राज्यसभेसाठी नियुक्ती झाली आहे.