Raosaheb Danve | अजित पवारांच्या विधानावर रावसाहेब दानवेंचा टोला; म्हणाले – ‘उद्या ते असंही म्हणतील की महिलाही…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Raosaheb Danve | काही दिवसांपूर्वी राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने (Maharashtra Government) घेतला आहे. यानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या निर्णयाला भाजपने (BJP) विरोध करत महाविकास आघाडीवर (Maha Vikas Aghadi Government) ताशेरे ओढले आहेत. यानंतर आता भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी देखील राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या विधानावरून रावसाहेब दानवे यांनी टोला लगावला असल्याचे दिसते.

 

रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) म्हणाले, ”खरंतर या राज्य सरकारमध्ये काय चाललंय? ना तर या सरकारमध्ये असलेल्यांना कळत, ना ते जनतेला कळत. आमच्या काळात काही जिल्हे आम्ही दारूमुक्त केले होते. जसा की चंद्रपूर जिल्हा, त्या ठिकाणी आम्ही दारूबंदी केली होती, लोकांची मागणी होती. मात्र हे सरकार आलं त्यांनी पुन्हा चंद्रपूरला दारू सुरू केली आणि केवळ एवढ्यावरच थांबले नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्रात पानटपरीवरही हे वाईन विकायला लागले आहेत”.

 

 

”आज वाईन विकायला लागले आहेत, उद्या बिअर विकतील आणि पुन्हा दारू विकायला लागतील. मला असं वाटतं की सरकारला जर उत्पन्न पाहिजे असेल, तर अनेक रस्ते मोकळे आहेत सरकारचं उत्पन्न वाढवण्यासाठी. दारू टपरीवर किंवा एखाद्या दुकानावर विकून पैसा उभा करणं हे या राज्य सरकारला पचनी पडलेलं नाही. अन्य राज्यात काही असो परंतु महाराष्ट्राची संस्कृती अशी नाही, राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतला पाहिजे.” असं रावसाहेब दानवे म्हणाले.

 

”अजित पवार काय बोलले मला माहीत नाही, मी काही बघितलेलं नाही.
पण वाईन आणि दारू मधला फरक, अल्कोहोल दोन्हीमध्येही आहे आणि अल्कोहोलचं प्रमाण काही कमी नाही.
उद्या ते असंही म्हणतील की महिलांनीही प्यायली तरी चालेल, असं नाही होणार.
मला असं वाटतं की याचं समर्थन कोणीही करू शकत नाही.” असं देखील रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Raosaheb Danve | BJP leader and union minister raosaheb danve criticizes ajit pawar and the state government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा