×
HomeशहरऔरंगाबादRaosaheb Danve | ‘सत्तार साहेब, तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून पैसे घेऊन लखपती झाला मी...

Raosaheb Danve | ‘सत्तार साहेब, तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून पैसे घेऊन लखपती झाला मी लोकपती आहे’, रावसाहेब दानवेंनी कोणत्या पैशांचा उल्लेख केला; सभास्थळी चर्चांना उधाण

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या सिल्लोड मतदारसंघात (Sillod constituency ) सभा झाली. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केलेल्या एका विधानामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. सत्तार साहेब, तुम्ही मुख्यमंत्री यांच्याकडून पैसे घेतले आणि तुम्ही लखपती झालात. मात्र मी लोकपती असल्याचे रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) म्हणाले. आता दानवे यानी विकास निधीच्या पैश्याचा उल्लेख केला की इतर कोणत्या पैश्याचा याची चर्चा सभास्थळी पहायला मिळाली. यापूर्वी बंडखोर आमदारांनी (Rebel MLA) पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यातच दानवे यांच्या या वक्तव्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

 

रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) म्हणाले, अब्दुल सत्तार साहेब, ज्यांना-ज्यांना तुम्हाला पक्षात आणायचे त्यांना पक्षात घ्या. तुम्ही मुख्यमंत्री यांच्याकडून पैसे घेतले असल्याने तुम्ही लखपती झाला आहात. परंतु तरीही मी लोकपती असून, रुग्णालयात राहून सुद्धा निवडून आलो असल्याचे दानवे म्हणाले.

यावेळी बोलताना रावसाहेब दानवे यांनी चौफेर फटकेबाजी केली.
ते म्हणाले, मी आणि अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) किती जवळचे मित्र आहे हे सर्वांना माहित आहे.
आतातरी एकत्र यावे असा टोला त्यांनी सत्तार आणि खोतकर यांना लगावला.
काही झाले तरी दानवे यांनी केलं असे म्हणतात.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नको त्या माणसासोबत युती केली आणि एवढं सगळं घडले.
आता हे नवीन आलेले सरकार हे अडीच वर्ष आणि पुढील पाच वर्षे काम करेल असा दावा दानवे यांनी केला.

 

Web Title :- Raosaheb Danve | bjp leader and union minister raosaheb danve said that sattar took money from cm eknath shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Must Read
Related News