भर पत्रकार परिषदेत दानवेंना मोदींचा विसर ,म्हणाले … 

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाईन  – कधी कधी आपल्याला बोलायचं असतं एक आणि आपण बोलतो भलतंच. असच काहीसं  भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या बाबतीत झालं. दानवे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा विसर पडला त्यांनी मोदींऐवजी अटलबिहारी वाजपेयींचे नाव घेतले. शेजारी बसलेल्या प्रदेश सरचिटणीस संजय कुटे यांनी चूक लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी क्षमा मागत पंतप्रधान मोदी असे म्हटले..
नक्की काय म्हणाले दानवे 
रावसाहेब दानवे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘भाजप आणि समविचारी पक्षांचा एकच उद्देश आहे की, या देशाचा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी व्हावे.’ त्यावेळी शेजारी बसलेल्या कुटेंच्या ही चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी दानवेंना मोदी-मोदी असे म्हणत, मोदी म्हणा असा इशारा केला. त्यामुळे लगेचच सावरत दानवे यांनी क्षमा मागत पंतप्रधान मोदी, असे म्हटले.
यावेळी त्यांनी भाजप-शिवसेनेच्या युतीवरही भाष्य केले. ते म्हणाले, ‘शिवसेनेकडून सध्या कोणतीही वक्तव्ये करण्यात येत असली तरी, त्यांनी युतीचा प्रश्न जनतेवर सोडला असल्याचे सांगितले आहे. राज्यातील जनतेची इच्छा आहे की, भाजप-सेनेची युती व्हावी’.