Raosaheb Danve | मनसे म्हणजे फटाक्याची लड, फुटायला लागली की थांबत नाही पण फायदाही होत नाही, दानवेंनी पवार, शिवसेनेला दिली ‘ही’ उपमा

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी कुटुंबीयांसोबत दिवाळी (Diwali Festival) साजरी केली. यावेळी त्यांनी राजकीय नेत्यांना फटाक्यांची उमपा देत आतीषबाजी केली. पत्रकारांनी दिवाळीचे फटाके आणि राजकारणी असे समीकरण जुळवत प्रश्न विचारला. यावर, रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे दिवाळीच्या फटाक्यांमधील रॉकेट (Rocket) असून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे अ‍ॅटम बॉम्ब (Atom Bomb) आहेत. यावेळी इतरही राजकीय पक्षांना त्यांनी फटाक्यांची उपमा देत टीका केली. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे रॉकेट नेते असून, अ‍ॅटम बॉम्ब देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे रॉकेट आणि अ‍ॅटम बॉम्ब फक्त आमच्याजवळ आहे. सध्या राजकारणात लवंगी फटाके खूप झाले आहेत, प्रत्येक पक्षात असे लवंगी फटाके आहेत.

तर फटाक्यांची लड म्हणजे मनसे (MNS) असून, एकदा फुटायला लागली की थांबतच नाही.
या लडमधील फटाका फुटतो पण फायदा काही होत नाही.
फक्त आवाज येतो, असे म्हणत दानवे यांनी एकीकडे मनसेचे कौतुक केले तर दुसरीकडे टीकाही केली.
दानवे म्हणाले, आवाज देणारा खाकी फटाका म्हणजे आपल्या राज्यात शरद पवार (NCP Chief Sharad Pawar)
यांना म्हणता येईल. तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना (Shivsena) म्हणजे
फुसका फटाका आहे.

महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) टीका करताना दानवे म्हणाले,
अडीच वर्षात एकदाही आवाज केला नाही. आता आमचे सरकार आले आणि शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे आले.
अडीच वर्षे या राज्याची वाया गेली. त्यामुळे ज्या सरकारने राज्याच्या जनतेची अडीच वर्षे वाया घालवली त्यांना फुसका फटका म्हणता येईल.

Advt.

Web Title :- Raosaheb Danve | narendra modi is a rocket and devendra fadnavis is an atom bomb raosaheb danave compares sharad pawar with firecracker aslo shivsena

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Bacchu Kadu | बच्चू कडू यांनी निर्वाणीचा इशारा देताच शिंदे गटात वेगवान हालचाली, दीपक केसरकरांनी केलं सूचक विधान

MY Rikshawala App | ‘ओला’, ‘उबर’शी स्पर्धा करणार ‘बघतोय रिक्षावाला’चे ‘माय रिक्षावाला’ अ‍ॅप; कामगार संघटनेने स्वत:चे स्टार्टअपच्या माध्यमातून देशात प्रथमच तयार केले अ‍ॅप्लिकेशन