Raosaheb Danve | 2017 च्या राष्ट्रवादी-भाजप युतीच्या बंद दाराआड चर्चेचा तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी केला खुलासा; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Raosaheb Danve | 2017 साली भाजप राष्ट्रवादी (BJP-NCP Alliance) एकत्र येणार असल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी केला आहे. शेलारांच्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे. अशातच आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी त्या बंद दाराआड झालेल्या चर्चेबाबत मोठा खुलासा केला आहे.

 

2017 मध्ये राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीबाबत चर्चा सुरू होती मात्र त्यावेळी फक्त राष्ट्रवादी आणि भाजपचं सरकार असावं असं म्हणणं राष्ट्रवादीचं होतं.
मात्र आम्ही 25 ते 30 वर्षे शिवसेनेसोबत युतीत होतो त्यामुळे त्यांना सोडणं किंवा धोका देणं हे आमच्या मतदाराला पटणार नाही, असं आमचं म्हणणं होतं.
या मुद्द्यावर सर्व चर्चा फेल ठरली असल्याचं रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी म्हटलं आहे.

 

आपण कॉमन मिनिमम प्रोग्राम (Common Minimum Program) तयार करू असं राष्ट्रवादीला सांगितलं होतं.
शिवसेनेलासोबत घेण्यास काय हरकत आहे ?, मात्र तेव्हा राष्ट्रवादीचे त्या बैठकीत होते त्यांनी सांगितलं की,
आमची विचारधारा एक नाही त्यामुळे आमचं सरकार बनू शकत नाही, असं रावसाहेब दानवेंनी सांगितलं.

 

दरम्यान, आम्हाला काही गोष्टी उकरून काढायच्या नाहीत पण ते प्रवृत्त करत आहेत.
अजूनही काही गोष्टी आहेत त्या आम्हाला बोलायच्या नाहीत.
आम्हाला कोणतीही नावं उघड करायची नाहीत मात्र त्यांच्याकडून जर नावं उघडी झालीत तर आम्ही पण करू,
असं म्हणत दानवेंनी इशारा दिला.

 

Web Title :- Raosaheb Danve | ncp wanted alliance with bjp except shiv sena says bjp leader and union minister raosaheb danve

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा