Raosaheb Danve | मुंबईत लोकल ट्रेन सर्वांसाठी कधी सुरू होणार?, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Raosaheb Danve | राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक वाहने, बस, ट्रेन बंद करण्यात आली होती. नंतर कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्यानंतर सर्व जनजीवन सुरळीत सुरु झालं. अनेक सार्वजनिक वाहने जरी सुरु झाली असली तरी मुंबईची लोकल ट्रेन (Mumbai local train) मात्र अद्याप सर्वांसाठी बंदच आहे. पंरतु काही नियमांनुसार सध्या मुंबई लोकल ट्रेन सुरु आहे. सर्वासांठी लोकल ट्रेन खुली नसल्याने अनेक मुंबईकरांची अब्दा होत आहे. लोकल सुरु कधी होणार याच्या प्रतिक्षेत सध्या मुंबईकर आहेत. दरम्यान, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) मुंबई लोकल ट्रेनबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve ) यांनी आज (मंगळवारी) केंद्राची भुमिका मांडत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रावसाहेब दानवे म्हणाले की,मुंबई लोकल ट्रेन (Mumbai local train) सर्वांसाठी सुरू करण्यास केंद्र सरकारला कुठलीही अडचण नाही.
कोविडची साथ नियंत्रणात असल्याचं सांगून राज्य सरकारनं (State Government) लोकल सुरू करण्याची पत्राद्वारे विनंती केल्यास आम्ही तात्काळ परवानगी देऊ,
असे रावसाहेब दानवे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

नुकतंच राज्य सरकारने अटी आणि शर्ती घालून कोरोना लसीचे 2 डोस घेतलेल्यांना सध्या लोकल ट्रेननं प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
दरम्यान, त्यासाठी रेल्वेकडून विशेष मासिक पासची सोयही करण्यात आली आहे.
मात्र अनेक मुंबईकर लसीच्या दुस
ऱ्या डोसपासून वंचित असल्याचे समोर आहे.
दरम्यान सर्वासांठी मुंबई लोकल ट्रेन (Mumbai local train) कधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
यातच आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत भुमिका मांडली आहे.

Web Titel :-  Raosaheb Danve | raosaheb danve on starting mumbai local train for all

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा