पराभवाच्या छायेत असल्याने चंद्रकांत खैरेंची बुद्धी ‘भ्रष्ट’ झालीय : हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – चंद्रकांत खैरे यांचं वय झालं असून, त्यांना पराभव दिसू लागल्याने त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, अशी खरमरीत टीका हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर केली आहे. औरंगाबादमध्ये शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यात चांगलेच वाकयुद्ध रंगले आहे.

मला ना सासूने मदत केली ना सासऱ्याने असेही ते यावेळी म्हणाले. खैरेंची बुद्धी भ्रष्ट झाल्याने ते अशाप्रकारचे आरोप करत आहेत. सासऱ्यांनी मला ५० लाख दिले हे जर त्यांनी सिद्ध केले तर ते सांगतिल ते करायला मी तयार आहे. मी रावसाहेब दानवे यांच्या जावया आगोदर रायभान जाधव यांचा मुलगा आहे. त्यामुळे मी निवडणूक स्वतःच्या बळावर लढलो आहे. रावसाहेब दानवे यांनी जाधव यांना मदत केल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला होता. दानवे रोज हर्षवर्धन जाधव यांना पैसे पाठवत होते, असा आरोप देखील खैरे यांनी केला आहे.

दरम्यान, दानवे यांनी युतीऐवजी जावईधर्म पाळला असल्याचा आरोप खैरे यांनी केला होता. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप अध्यक्ष अमित शहांकडे तक्रारदेखील केली होती.

Loading...
You might also like