Raosaheb Danve | मंत्री रावसाहेब दानवेंनी पुण्यात भरसभेत दाखवला आपल्या अंगावरचा फाटका शर्ट; म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Raosaheb Danve | भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे आज (शनिवारी) पुण्यात (Pune) होते. पुण्यात एका सभेदरम्यान बोलताना दानवे यांनी विविध पैलुवर संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भरसभेमध्ये आपल्या साधेपणाचा दाखला देताना त्यांनी अंगावरचा फाटलेला शर्ट सभेतील उपस्थितांना दाखवला. त्यावेळी सगळ्याच्या नजरा वळल्या.

रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) म्हणाले, काल मी हैद्राबादला आमच्या एका मित्राकडे गेलो होतो. मोठा माणूस आहे तो, तेव्हा तो म्हणाला, दादा तुम्ही खादीचा शर्ट घ्या. का तर म्हणाला तुमचा शर्ट फाटलाय. नवीन शर्ट घ्या. मी म्हटलं शर्ट फाटलाय म्हणून काय फरक पडला? आता इथे तुम्ही सगळे पुण्याची (Pune) माणसं आहेत. यात कुणी फाटक्या शर्टचा माणूस येऊन बसलाय का मला सांगा बरं? घरातील बाईने तुम्हाला सांगितलं असेल, तुमचा शर्ट फाटलाय, बदलून घ्या. असा कुणी माणूस आहे का फाटलेला शर्टाचा? बघा माझा शर्ट इथे फाटलाय, असं ते म्हणाले.

मी सगळी पदं उपभोगली. मला मतदारसंघातील लोकांनी भरभरुन पदं दिली, मी केंद्रात 3 वेळा मंत्री जरी झालो असलो तरी साधेपणा सोडला नाही. असं रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे. पुढं रेल्वेच्या खासगीकरणाच्या धोरणावर बोलताना ते म्हणाले की, चांगली रेल्वेसुविधा द्यायची तर पैसा पण तसाच लागेल. पैसा कुठून आणणार? भाडं तर वाढवू शकत नाही. म्हणून आम्ही काही रेल्वे खासगीत चालवायला दिल्या, असं रावसाहेब दानवेंनी सांगितलं आहे.

 

Web Title : Raosaheb Danve | union minister of state raosaheb danve showed his torn shirt at punes maharashtra during speech

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Personal Loan On Aadhaar Card | कोरोनाने केले बेरोजगार ! या पध्दतीनं करा आधार कार्डद्वारे पर्सनल लोनसाठी अर्ज; जाणून घ्या

EPFO | मोठा दिलासा ! Aadhaar सोबत PF खाते जोडण्याचा कालावधी वाढवला, जाणून घ्या कधीपर्यंत करू शकता लिंक?

IIT Bombay Recruitment 2021 | आयआयटी मुंबईत ‘या’ पदांसाठी होणार भरती; 1 लाख रूपयांपर्यंत पगार