Raosaheb Danve | वीर सावरकर आमच्या आचाराविचारात आहेत – केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – वि. दा. सावरकर (V. D. Savarkar) हा राज्यासाठी सध्या चर्चा आणि भांडणाचा विषय झाला आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सावरकरांच्या माफिनाम्यावर भाष्य केले. तेव्हापासून भाजप (BJP) आणि शिंदे गट (Shinde Group) त्यांच्यावर टीकेची झोड उठवत आहेत. त्यात आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी भाष्य केले आहे. आम्ही सावरकरांच्या विचारांचे पाईक आहोत. सावरकर आमच्या आचाराविचारात आहेत, असे रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) म्हणाले आहेत.

 

या देशात जन्माला आलेल्या प्रत्येक नेत्याचे या देशासाठी योगदान राहिले आहे. आम्ही कधीच कोणाचे योगदान नाकारले नाही. पंडित नेहरूंबद्दल किंवा इंदिरा गांधीबद्दल आम्ही कोणते वक्तव्य केले नाही. पण, हा मुद्दा राहुल गांधी यांनी उखरुन काढला आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले की, 50 वर्षांचा इतिहास उकरून काढण्यापेक्षा भविष्याचा विचार केला पाहिजे. त्यावर दानवे म्हणाले, ज्यांच्या मांडीला मांडी लावून सरकार चालवले, त्यांच्याच मित्रपक्षाने सावरकरांबद्दल अशा प्रकारचे शब्द काढले. त्यामुळे आता तुम्ही त्यांच्यासोबत पुढच्या काळात राहणार आहात का, की त्यांच्यापासून फारकत घेणार आहात? असे यावेळी दानवे यांनी विचारले.

 

तसेच राहुल गांधी यांचे काही वाचन नाही, त्यांना देशाचा आणि राष्ट्रपुरुषांचा इतिहास माहीत नाही,
त्यामुळे त्यांच्या तोडूंन अशा गोष्टी निघत आहेत. त्यांनी या वादाला सुरुवात केली.
त्यांना आम्ही हा वाद घालायला सांगितला नव्हता.

 

Web Title :- Raosaheb Danve | Veer Savarkar is in our thoughts – Union Minister Raosaheb Danve

 

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | विचार सोडून आमच्यासोबत या म्हटलं नव्हतं, काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना सुनावलं

MNS | राज्यपालांच्या वक्तव्याचा मनसेकडून समाचार; छत्रपती शिवाजी महाराज कायम आदर्श राहतील

Pune Pimpri Crime | घराशेजारी राहणाऱ्या महिलेला अश्लील व्हिडीओ पाठवून विनयभंग, पिंपरी चिंचवड परिसरातील घटना