‘रावसाहेब दानवेंचा बाप दिल्लीत, आहेराची पाकिटे घेऊन पळाला’, CM उद्धव ठाकरेंचा घणाघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देश संकटात आहे आणि भाजप (bjp) राजकारण करत आहे. कोरोना (coronaviurs) आहे, संकट आहेत, जीएसटी (gst) नाही, पैसे येणार कुठून ? आमचा जीएसटीचा निधी केंद्र सरकार का देत नाही. जवळपास 38 हजार कोटी रुपये केंद्राकडे आहेत. जीएसटी सदोष असेल तर मोदींनी (Pm Narendra Modi) मागे घ्यावा आणि माफी मागावी, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी केली. माझे काम पुढील महिन्यात तुमच्या पुढे ठेवणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आज शिवसेनेचा दसरा मेळावा कोरोनामुळे 50 पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती ऑनलाइन घेण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. तसेच आमच्यावर टीका करणाऱ्या रावसाहेब दानवेंचा (raosaheb danve) बाप दिल्लीत असेल माझा बाप भाडोत्री नाही, अशा शब्दांत फटकारलं. रावसाहेब दानवेंनी लग्न तुम्ही केले आणि बापाकडे मागताय असा सवाल केला होता. यावर ठाकरे यांनी समाचार घेतला. तुमचा बाप आहेराची पाकिटे घेऊन मोजतो असे सांगून संयमाचं महत्त्व कळतं. महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्यांच्या छाताडावर गुढी पाडवा साजरा करेन. वाघाची अवलाद आहे, डिवचाल तर पस्तवाल असा इशारा त्यांनी भाजपला दिला.

घंटा बडवा थाळ्या बडवा हे तुमचं हिंदुत्व, आमचं हिंदुत्व असलं नाही, हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व. बाबरी वेळी शेपट्या घालणारे हिंदुत्त्वावर बोलत आहेत. आम्हाला विचारत आहेत तुमचे हिंदुत्व कुठे गेले ? इथे गाय म्हणजे माता, पलिकडे जाऊन खाता. गोव्यात गोवंश बंदी का नाही. सरसंघचालकांकडून हिंदुत्व शिकून घ्या, असा सल्लाही त्यांनी भाजपाच्या नेत्यांना दिला.

आमच्या अंगावरती येत आहात, महाराष्ट्रा द्वेष पाहिल्यानंतर मी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो, सावध रहा. आदित्य, ठाकरे कुटुंबावर चिखलफेक झाली हे भयंकर होतं. बिहारच्या सुपुत्रावर चिखलफेक करणारे महाराष्ट्राच्या सुपुत्रावर चिखलफेक करताहेत. तुम्ही रातोरात झाडांची कत्तल करत होता, आम्ही 808 एकराचं जंगल वाचवलं, एक रुपया खर्च न करता मेट्रो कारशेड उभारतोय. बेडूक आणि त्यांची पिल्लं वाघ पाहून ओरडत सुटले, असा टोला राणे कुटुंबाला लगावला.