‘सिंगर’ करण ओबेरॉयची पोलिस निरीक्षकाविरूध्द तक्रार !

मुंबई : वृत्तसंस्था – पोलिसांच्या ताब्यात आल्याच्या तीन आठवड्यानंतर कारण ओबेरॉयने या प्रकरणाची तपासणी करणारा इंस्पेक्टर दीपक सोनवणेच्या विरोधात गुन्हा दाखल केला. करणचा असा आरोप आहे की, इंस्पेक्टरने त्याच्या विरोधात खोटा अहवाल सादर केला आहे. एका वृत्तपत्राच्या अहवालानुसार इंस्पेक्टरने करण विरोधात एकतर्फा आरोप सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.

करणचा वकिल दिनेश तिवारी मुंबईच्या मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेटच्या न्यायालयात याचिका दाखल केली की, पोलीस इंस्पेक्टरवर कारवाई करावी. एका वृत्तपत्राशी बोलत असतांना करणने सांगितले की, सोनवणे आणि टीमने माझा मोबाईल व लॅपटॉप जप्त केला होता. सोनवणेने दावा केला होता की, करणचा मोबाईल व लॅपटॉप पोलिसांनी घेतलेला नाही. करणने सांगितले की, एक महिन्याच्या तक्रारीनंतरही तक्रारदार महिलेचा फोन जप्त केला नव्हता.

इंस्पेक्टर सोनवणेने करणच्या सगळ्या गोष्टी चुकीच्या सांगितल्या. एका महिलेने करणवर आरोप केला होता की, करणने लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर रेप केला आणि त्याचा व्हिडीओ बनवला. त्यानंतर करणने व्हिडीओद्वारे महिलेला ब्लॅकमेल केले आणि पैसे गोळा करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात महिलेने एफआयआर दाखल केली.

काही दिवसांनी त्या महिलेकडून दुसरी तक्रार आली. तिने असे सांगितले होते की, काही बाईक चालकांनी मॉर्निंग वॉकच्या वेळी तिच्यावर हल्ला केला. त्या महिलेने सांगितले की, त्या बाईक चालकांनी ॲसिड हल्ला करण्याची देखील धमकी दिली. तपास केल्यानंतर असे समोर आले की, महिलेने केलेले दावे खोटे होते. तिने हा प्लॅन केला होता. कारण ती करणला चुकीचं सिद्ध करु शकेल. त्यानंतर मुंबई पोलिसांनी महिलेला अटक केली.

छोट्या दुखण्यांकडे करू नका दुर्लक्ष, मोठ्या आजाराचे असू शकते लक्षण

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

रक्त शुद्ध करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती

बाळासाहेब आंबेडकर यांची मुंबईत आज पत्रकार परिषद ,विधानसभेबाबत करणार मोठा खुलासा