विकृतीचा कळस ! 90 वर्षाच्या महिलेवर नराधमानं केला ‘बलात्कार’, पोलिस पकडतील म्हणून केला ‘खून’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच आहेत. दिवसांढवळ्या अल्पवयीन मुलींपासून वृद्ध महिलांपर्यंत अत्याचाराला रोज कोण ना कोण तरी बळी पडत आहे. क्षणक्षणाला स्त्रीया सुरक्षित नसल्याची ही साक्ष आहे. तेलंगणात देखील अशीच एक धक्कादायक घटना घडली. 90 वर्षांच्या एका वृद्ध महिलेवर एका नराधमाने बलात्कार केला आणि त्यानंतर पकडले जाऊ या भीतीने वृद्धेची हत्या केली.

तेलंगणाच्या अनुमुला गावात ही घृणास्पद घटना घडली. नळगोंडा जिल्ह्याच्या हलिया मंडलजवळ हे गाव स्थित आहे. 90 वर्षांच्या या आजी एकट्याच राहत होत्या. तेथून त्यांच्या मुलाचं घर जवळच होतं. मुलगा आणि सून म्हाताऱ्या आईला काय हवं – नको ते पाहायचे. रविवारी सासूबाई चहा देण्यासाठी त्यांच्या घरी गेलेल्या सुनेला त्यांचा मृतदेह आढळला. हे पाहून घाबरलेल्या सूनेनं आरडाओरडा केला. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांनी देण्यात आली.

पोलिसांनी या 90 वर्षीय महिलेच्या अंगावर दात आणि नखांच्या जखमा आढळल्या, या आजींवर मृत्यूपूर्वी अतिप्रसंग झाल्याचे उघड झाले आहे. या आजीच्या मुलाने पोलिसात तक्रार करुन सत्रसाला शंकर या 22 वर्षीय तरुणावर संशय व्यक्त केला आहे, तो आपल्या आईच्या घराजवळ दारुच्या नशेत फिरताना आढला होता असे त्यांनी तक्रारीत म्हणले आहे.

शंकर हा हमाल म्हणून काम करतो. स्त्रियांशी असभ्य वर्तन केल्याच्या तक्रारी त्याच्या विरोधात आहेत. गावातल्या अनेक स्त्रीयांना त्याने छेडले होते असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलीस शंकरचा शोध घेत आहेत, गुन्ह्यानंतर तो फरार आहे. या वृद्ध महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नळगोंड्याच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.