क्राईम स्टोरीताज्या बातम्या

Rape Attempt | धक्कादायक ! प्रॅक्टिकलच्या बहाण्याने गुंगीचा पदार्थ देऊन 17 मुलींवर बलात्काराचा प्रयत्न ! 2 शाळेच्या व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल

मुजफ्फरनगर : वृत्तसंस्था – Rape Attempt | उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात (Muzaffar Nagar News) दोन खासगी शाळांच्या व्यवस्थापकांवर 17 मुलींना कथित प्रकारे नशेचा पदार्थ पाजून लैंगिक छळ (Molestation) करणे तसेच बलात्काराचा प्रयत्न (Rape Attempt) करण्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याने एका पोलीस अधिकार्‍यावर कारवाई करण्यात आली आहे.

 

आमदाराच्या हस्तक्षेपानंतर गुन्हा दाखल
मुजफ्फरनगर जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अभिषेक यादव (SP Abhishek Yadhav) यांनी सोमवारी सांगितले की, भारतीय जनता पार्टीचे (BJP) नेते आणि स्थानिक आमदार प्रमोद उटवाल यांच्या हस्तक्षेपानंतर कुटुंबाच्या तक्रारीनंतर गुन्हा (Rape Attempt) दाखल करण्यात आला.

 

त्यांनी सांगितले की, पुरकाजी पोलीस ठाण्याचे प्रभारी विनोद कुमार सिंह (Police Officer Vinod Kumar Singh) यांनी प्रकरणात कथित प्रकारे निष्काळजीपणा केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

 

दोन शाळांच्या व्यवस्थापकांचे कृत्य
तसेच भोपा पोलीस ठाण्यातील सूर्यदेव पब्लिक स्कूलचा व्यवस्थापक योगेश कुमार चौहान आणि पुरकाजी परिसरातील जीजीएस इंटरनॅशनल स्कूलचा व्यवस्थापक अर्जुन सिंह यांच्या विरोधात लैंगिक छळ, नशेचा पदार्थ देणे आणि पॉक्सो कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

 

रात्रभर शाळेत थांबल्या मुली
यादव यांनी सांगितले की, ही कथित घटना त्यावेळी घडली जेव्हा योगेश सूर्यदेव पब्लिक स्कूलमध्ये 10वीमध्ये शिकणार्‍या 17 मुलींना प्रायोगिक परीक्षा देण्यासाठी जीजीएस स्कूलमध्ये नेण्यात आले होते आणि त्यांना तिथे रात्रभर थांबावे लागले होते.

 

पीडित मुलींच्या कुटुंबियांच्या तक्रारीनुसार, दोन्ही आरोपींनी अल्पवयीन मुलींना कथित प्रकारे गुंगीचा पदार्थ पाजून त्यांचा लैंगिक छळ केला आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न (Rape Attempt) केला.

कृत्यानंतर मुलींना दिली धमकी
वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) यादव यांनी सांगितले की, कुटुंबियांची तक्रार आहे की,
आरोपींनी मुलींना धमकी दिली की, त्यांनी घटनेबाबत कुणालाही सांगू नये.
कुटुंबियांनुसार, जेव्हा ते स्थानिक पोलीस ठाण्यात पोहचले,
तेव्हा पोलिसांनी कोणतेही पाऊल उचलले नाही, ज्यानंतर त्यांनी आमदारांशी संपर्क साधला.

 

या कलमांखाली गुन्हा दाखल
एसएसपीने सांगितले की, शाळा व्यवस्थापनाच्या दोन लोकांविरोधात भारतीय दंड विधान कलम 328 (गुन्हा करण्याच्या हेतूने विष इत्यादीद्वारे इजा पोहचवणे),
कलम 354 (महिलेच्या प्रतिष्ठेचा अवमान करण्याच्या हेतूने हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करणे)
आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे सरंक्षण कायद्याच्या (POCSO) संबंधीत कलामांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- Rape Attempt | 17 class 10th girls molested in up muzaffarnagar officials of 2 schools face fir

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Hingoli Crime | धक्कादायक ! सुनेला खोलीत कोंडून सासऱ्याचं विकृत कृत्य

Pune Crime | पुण्यातील 27 वर्षीय तरूणीला गुंगीचे औषध देऊन सलग 4 दिवस लैंगिक अत्याचार, मुंढव्यातील केशवनगर परिसरातील घटना

Gold Price Today | खूशखबर ! लग्नसराईतही सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव

Back to top button