Rape Case | 18 वर्षीय मुलीला दारू पाजून बाथरुममध्ये नेऊन केले अत्याचार; आरोपीला 9 वर्षांचा तुरुंगवास

लंडन : वृत्तसंस्था – Rape Case | दारू पाजून 18 वर्षीय मुलीला बाथरुममध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार (Rape Case) केल्याची घटना उत्तर हॅम्प्टन (North Hampton), युनायटेड किंगडम (United Kingdom) (UK) येथे घडली. दरम्यान, यावेळी मुलीच्या मोबाइलचे ऑडिओ रेकॉर्डिंग (Audio recording) चालू होते. त्यामुळे बलात्काराची घटना (Rape Case) उघडकीस आली. याबाबतचे वृत्त द सनमध्ये प्रसिद्ध झाले आहे. आरोपीचे नाव डॅनिश (Danish) (वय – 38) आहे. पोलिसांच्या तपासणीत आरोपीविरोधात भक्कम पुरावे सापडले आहेत.

आरोपीचे पीडितेवर आरोप

आरोपीने न्यायालयातील सुनावणी दरम्यान सांगितले की, त्या मुलीवर कोणतीही जबरदस्ती केली नाही. संबंध ठेवण्यास ती तयार होती. तेथून निघून गेल्यावर तिने माझ्यावर खोटे आरोप केले.

अशा प्रकारे आरोपीचा गुन्हा झाला सिद्ध

या घटनेत फोनचे ऑडिओ रेकॉर्डिंग हा सर्वात मोठा पुरावा होता. ज्यावेळी हि घटना घडली त्यावेळी पीडितेकडे फोन होता. त्या फोनमध्ये हा सर्व प्रकार रेकॉर्ड झाला. या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये पीडितेचा वेदनादायक आवाज ऐकू येतो. ती त्याला वारंवार सांगते की, तिला सोडून दे आणि घरी जाऊ दे. पण आरोपींनी त्याला जाऊ दिले नाही आणि अत्याचार सुरूच ठेवले.

त्यामुळे न्यायालयाने (Court) डॅनिशला दोषी (Guilty) मानले आणि पीडित मुलीशी जबरदस्तीने संबंध ठेवल्याचे सांगितले. न्यायालयाने डॅनिशला 9 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा (Imprisonment) सुनावली आहे. न्यायाधीश क्रेन (Judge Crane) म्हणाले की, डॅनिश सारखे लोक तरुणींचा गैरफायदा फायदा घेतात. मुलीच्या इच्छेने संबंध ठेवल्याचे सांगून डॅनिशनेही कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title : Rape Case | girl raped after getting drunk accused caught phone recording uk police investigation

SSC Exam Results | पुण्यातील शाळांमध्ये 10 वीच्या गुणपत्रिका 9 ऑगस्टपासून मिळणार

Parambir Singh | परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ;
ठाण्यात तिसरा FIR दाखल, जाणून घ्या प्रकरण?

Sugarcane Juice | ऊसाचा रस लीव्हरसाठी खुपच ‘हेल्दी’,
वायरल इन्फेक्शनपासून होईल बचाव, इम्यूनिटी वाढते

Coronavirus | राज्यातील ST महामंडळाच्या बसेसला करणार अँटी मायक्रोबियल कोटिंग,
व्हायरस पसरण्यापासून रोखणार

Coronavirus | कोरोना संक्रमित झाल्यानंतर तरूणाला समजले 18 जुन्या आजारांचे रहस्य,
लहानपणी केली होती ही चूक