‘मनमोहन सरकार’नं दिली होती बलात्कार्‍यांना ‘फाशी’, तेव्हापासुन आजपर्यंत 4 लाख ‘रेप’ केस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येनंतर संपूर्ण देश पेटून उठला आहे. देशात महिलेच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लोक पीडितेला न्याय मिळावा म्हणून रस्त्यारवर उतरत आहेत. गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करत आहेत परंतू तुम्हाला हे माहित आहे की आपल्या देशात बलात्कार प्रकरणातील कोणत्या आरोपीला फाशीची शिक्षा कधी सुनावण्यात आली किंवा त्यानंतर आपल्या देशात किती बलात्काराच्या घटना घडल्या.

14 ऑगस्ट 2004 –
हीच ती तारीख ज्या तारखेला एखाद्या बलात्काराच्या गुन्हातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म करुन त्या मुलीची हत्या केल्या प्रकरणी धनंजय चटर्जी या आरोपीला फाशी देण्यात आली होती. धनंजयला कोलकत्यातील अलीपूर तुरुंगात फाशी देण्यात आली. या घटनेला आता 15 वर्ष झाले. तेव्हापासून आजपर्यंत देशात 4 लाख पेक्षा जास्त बलात्काराच्या घटना घडल्या परंतू काहीही बदलले नाही. या 15 वर्षात दुसऱ्या कोणत्याही बलात्कारातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली नाही.

धनंजय चटर्जीला फाशी देण्यात आली, तेव्हा केंद्रात नवे यूपीए सरकार आले होते आणि मनमोहन सिंह पंतप्रधान बनले होते आणि एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती होते. धनंजय कडून राष्ट्रपतीकडे फाशी रोखण्याची विनंती केली होती परंतू राष्ट्रपतीने ही मागणी फेटाळली. जेव्हा महाराष्ट्रात सत्तेचा खेळ सुरु होता तेव्हा हैदराबादमध्ये ही बलात्काराची घटना घडली. परंतू याकडे कोणीही लक्ष दिले नाही कारण सत्तेचा खेळ सुरु होता. आता आज सर्वजन न्यायाची मागणी करत आहेत.

निर्भया केसनंतर देखील बदलला नाही देश ?
2012 साली निर्भया प्रकरण झाले होते तेव्हा देखील देश पेटून उठला होता. तेव्हा निर्भया केस फास्ट ट्रॅक कोर्टात नेण्यात आली. फास्ट ट्रॅक कोर्टाने फक्त 9 महिन्यात हा निर्णय दिला. 13 सप्टेंबर 2013 साली निर्भयाच्या गुन्हागारांना फाशी देण्याचा हा निर्णयाचा आज 6 वर्षानंतर काहीही फायदा झाला असे वाटत नाही.

निर्भया बलात्कार प्रकरणानंतर कठुआमध्ये देखील अल्पवयीन मुलीबरोबर असाच प्रकार घडला. मुंबईत शक्ति मिल्स मधील सामूहिक बलात्कार प्रकरण समोर आले, 2010 मध्ये दिल्लीत आणखी एक बलात्काराची घटना घडली. मध्यप्रदेशात एका लहान मुलीबरोबर असाच एक प्रकार घडला. या प्रकारच्या अनेक घटना घडल्या परंतू कोणालाही फाशी देण्यात आली नाही. काही प्रकरणात अजन्म कारावासाची शिक्षा देण्यात आली.

लाजीरवाणे आहेत देशातील बलात्काराच्या घटनेचे आकडे –
देशात दरवर्षी 40 हजार, दररोज 109 आणि प्रत्येक तासाला 5 मुलीबरोबर बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. या देशात जीडीपीचा दर कमी झाल्याच्या बातम्या तर आल्या परंतू बलात्काराच्या घटना कमी झाल्या अशी बातमी आली नाही.

– मागील 10 वर्षात जवळपास 2.79 लाख बलात्काराचे गुन्हे दाखल
– सरासरी 40 हजार मधील 10 हजार बलात्काराची प्रकरणे समोर आली ज्यात अल्पवयीन मुलीचा बळी गेला.
– दरवर्षी 2000 अशी प्रकरणं आहेत ज्यात पीडिता सामूहिक बलात्काराच्या बळी ठरल्या.
– बलात्काराच्या प्रकरणात फक्त 25 टक्के गुन्हेगारांना शिक्षा मिळाली.
– बलात्काराचे 71 टक्के प्रकरण तर अशी आहेत ज्याच्या तक्रारी दाखलच झाल्या नाहीत.

देशातील लोकसभेत आणि विधानसभेत बसलेल्या 30 टक्के नेत्यांवर विविध गुन्हा दाखल आहेत, ज्यातील 51 नेत्यांवर महिलांच्या विरोधात गुन्हे केल्याची तक्रार दाखल आहे. 4 नेते तर असे आहेत ज्यांच्यावर थेट बलात्काराची प्रकरणं दाखल आहेत.

देशात सध्या आयपीसीच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत जवळपास 30 कोटी प्रकरण दाखल आहेत, ज्यावर विविध न्यायालयात सुनावणी सुरु आहे यातील 30 लाख पेक्षा जास्त प्रकरणं 21 उच्च न्यायालयात पडून आहेत, आणि विशेष म्हणजे दीड लाखापेक्षा जास्त खटले फक्त आणि फक्त बलात्काराची आहेत.

जगभरात बलात्कारातील गुन्हेगारांना मिळणारी शिक्षा –
1. सौदी अरबमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांचा प्रायव्हेट पार्ट कापला जातो.
2. अमेरिकात या गुन्हेगारांना विषारी इंजेक्शन देऊन मारले जाते.
3. यूएईमध्ये या गुन्हेगारांनी एका आठवड्यात फाशीवर चढवले जाते.
4. चीनमध्ये डीएनए मॅच झाल्यांनतर थेट फाशी दिली जाते.
5. इंडोनेशियामध्ये या गुन्हेगाराचे गुप्तांग कापून शरीरात महिलांचे हार्मोन्स सोडले जातात.
6. उत्तर कोरियात दोषींना थेट गोळीच मारली जाते.
7. जर्मनीत या गुन्हेगारांना गॅस चेंबरमध्ये टाकून मारले जाते.
8. काही देशात या गुन्हेगारांना खुर्चीवर बसून 2 हजार व्होल्टेजचा करंट दिला जातो.

Visit : policenama.com