Rape Case | 3 लग्न झालेल्या पोलिस कर्मचार्‍याकडून स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – Rape Case | पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने (Police personnel) आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची (Rape Case) घटना घडली आहे. या घटनेमुळे नात्याला आणि खाकी वर्दीला काळीमा फासला आहे. ही धक्कादायक घटना नांदेमध्ये (Nanded) घडली आहे. विशेष म्हणजे आरोपी पोलीस कर्मचाऱ्याची तीन लग्न झाली आहे. त्यानं दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात (Shivaji nagar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नराधम बापावर बाल लैंगिक अत्याचारासह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने नराधम पोलीस कर्मचाऱ्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी (police custody) सुनावली आहे. आरोपी पोलीस कर्मचारी हा शिवाजी नगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीनं पहिली पत्नी सोडल्यानंतर दुसरीसोबत संसार थाटला होता. पंरतु तिच्यासोबत देखील न पटल्याने त्याने तिसरा संसार थाटला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या दोन मुलं आणि मुलींना भेटण्यासाठी नेहमी येत होता. काही दिवसांपूर्वी तो मुलांना भेटण्यासाठी दुसऱ्या पत्नीच्या घरी आला होता. दरम्यान आरोपीने आपल्या दहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने या घटनेबाबत कुठे वाच्चता केली तर जीवे मारण्याची धमकी दिली. यासंबंधीचे वृत्त एका वेबसाईटने दिले आहे.

आरोपी पोलीस कर्मचाऱ्याच्या दबावाला काही दिवस बळी पडल्यानंतर अखेर पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
महिलेने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात पतीविरोधात फिर्याद दिली.
पोलिसांनी महिलेच्या फिर्यादीवरुन पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली. पुढील तपास पोलीस करित आहेत.

Web Title :- Rape Case | police married with 3 women and raped his own minor daughter nanded

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supreme Court | महाराष्ट्र सरकारला उपचाराचे दर ठरवण्याचा अधिकार नाही

‘या’ पद्धतीने आणि नाण्यांच्या बदल्यात मिळताहेत 1900 रुपयांपासून 1.5 लाख, तुमच्याकडे असतील तर ताबडतोब करा ‘हे’ काम

Earthquake | काही तासात देशात 5 ठिकाणी भुकंपाचे धक्के; बिकानेर, मेघालय तीव्र धक्क्याने हादरला