Rape Case Pune | पुणे : मैत्रीचे रुपांतर प्रेमात, लग्नाच्या आणाभाका घेत मुलीवर अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rape Case Pune | मुलीसोबत मैत्री करुन तिल प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तिच्यासोबत शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवून पैशांची मागणी केली. मात्र, मुलीने पैसे देण्यास नकार दिल्यावर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार मार्च 2023 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत बालेवाडी (Balewadi) येथे घडला आहे.(Rape Case Pune)

याबाबत पीडित मुलीने मंगळवारी (दि.23) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन भरत राज पुरोहित Bharat Raj Purohit (रा. सेवतलाव, ता देसुरी, जि. पाली, राजस्थान) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकमेकांचे मित्र होते. मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले.

आरोपी भरत याने पीडीत मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवले.
आपण लग्न करुन संसार करु, पुण्यात एखादे घर घेऊ, व्यवसाय करु असे सांगून मुलीचा विश्वास संपादन केला.
तिला लग्न करणार असल्याचे सांगून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
काही दिवसांनी आरोपीने पीडित मुलीकडे पैशांची मागणी केली.
मात्र, तिने पैसे देण्यास नकार दिला असता त्याने पैसे दिले नाही तर तुला बघून घेतो अशी धमकी दिली.
तसेच आपल्या संबंधाबाबत घरच्यांना सांगून फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Reliance Jio | डाटा वापरात चायना मोबाईलला मागे टाकून रिलायन्स जिओ बनला जगातील सर्वात मोठा मोबाईल ऑपरेटर

Devachi Uruli Garbage Depot | देवाची उरुळी कचरा डेपोतील लॅन्डफिलिंग व रामटेकडी प्रक्रिया प्रकल्पात ‘गोलमाल’ प्रकरणाची चौकशी करणार – अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी.