संतापजनक ! तोंडावर असिड फेकण्याची धमकी देऊन तेलनाडे बंधूंनी केला महिलेवर बलात्कार

इचलकरंजी : पोलीसनामा ऑनलाईन – तोंडावर असिड फेकण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देत नगरसेवक तेलनाडे बंधू आणि त्यांच्या साथीदारांनी विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचे ५० हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकऱणी तेलनाडे बंधुंसह पाचजणांवर गावभाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरसेवक संजय तेलनाडे, नगरसेवक सुनील तेलनाडे (दोघे रा. गावभाग), अड. पवनकुमार उपाध्याय (शिक्षक कॉलनी), प्रशांत होगाडे आणि तेलनाचा याचा चालक सादीक मुजावर यांच्यावर गावभाग पोलीस ठाण्यात महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील प्रशांत होगाडे याला पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

प्रशांत होगाडे याने पिडीत महिलेला अश्लील शिवीगाळ करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिय्चावर बलात्कार केली. त्यानंतर २००८ मध्ये तिचे लग्न झाले. मात्र लग्नानंतर त्याने तिच्या पतीला ती चारित्र्यहिन असल्याचे सांगत पिडीत आणि तिच्या पतीमध्ये वाद निर्माण केला.

त्यानंतर डिसेंबर २००८ ते मार्च २०१९ पर्यंत संजय तेलनाडे याच्या नावाची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार केला. जानेवारी २००९ मध्ये संजय तेलनाडे, सुनील तेलनाडे, अँड. उपाध्ये आणि तेलनाडेचा चालक सादीक मुजावर यांनी तिला जबरदस्तीने गाडीत बसवून कोल्हापूर नाका परिसरात नेले. तेव्हा मुजावर आणि उपाध्ये यांनी तिचे हात धरले आणि तेलनाडे बंधुंनी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने आरडाओरडा केल्याने सर्वजण पसार झाले.

मात्र मार्च २०१७ मध्ये ती महेश उर्फ सनी मेहता याच्या घरी वाढदिवसासाठी गेली. तेव्हा संजय तेलनाडे, सुनील तेलनाडे, यांच्यासह अड उपाध्ये यांनी तिला एका खोलीत नेले आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर २०१८ मध्ये पिडीत महिला तिच्या घरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुजेची तयारी करत असताना प्रशांत होगाडे, संजय तेलनाडे, सुनील तेलनाडे, अड. उपाध्याय तिच्या घरात घुसले. त्यांनी पुजेसाठी टेबलवर ठेवलेले दागिने घेतले. त्यानंतर ते घेऊन गेले. पिडीतेला सरकार सांगतील त्या ठिकाणी येण्याची व कोणालाही काहीही न सांगण्याची धकमी दिली. असे पिडीतेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

तेलनाडे टोळीवर मोक्का

संजय तेलनाडे याच्यासह १२ जणांवर मागील काही दिवसांपुर्वी सांगली पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीविरोधी कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. त्यानंतर त्यांच्याविरोधात दाखल झालेला हा तिसरा गुन्हा आहे.