संतापजनक ! कर्जाच्या वसुलीसाठी सावकराकडून नवविवाहितेला सिगारेटचे चटके देऊन बलात्कार

कोल्हापूर : पोलिसनामा ऑनलाइन – कोल्हापूरात कर्जाच्या वसुलीसाठी सावकाराने नवविवाहित तरुणीला सिगारेटचे चटके देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोल्हापूरातील शाहूपूरी पोलीस ठाण्यामध्ये सावकारासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कुटुंबावर सावकाराने कर्जाऊ दिलेल्या रक्कमेच्या वसुलीसाठी दबाव आणला. घरातील सुशिक्षित आणि अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेल्या नवविवाहित तरुणीला त्याने सिगारेटचे चटके देऊन मारहाणही केली. या तरुणीला ब्लॅकमेल करुन सावकाराने तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शाहूपुरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले असून या सावकाराचे नाव आत्ताच उघड करण्यास नकार दिला आहे. या सावकाराला आणखी दोघांनी मदत केली असून त्यांचा शोध सुुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. गुन्हयाचा तपास पोलीस करीत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like