कारमध्ये मालक करत होता महिलेवर बलात्कार, ड्रायव्हर चालवत राहिला गाडी

ग्वाल्हेर : मध्य प्रदेशमध्ये ग्वाल्हेर जिल्ह्यातून एक अशी घटना समोर आली आहे ज्यामध्ये एका महिलेने खळबळजनक आरोप केला आहे. एका व्यक्तीने तिला फॅक्टरीत काम देत असल्याचे सांगून आपल्या गाडीत बसवले आणि नंतर चालत्या कारमध्ये तिच्यावर रेप केला. यानंतर हॉटेलमध्ये तिला नेले आणि पुन्हा रेप केला.

ग्वाल्हेर जिल्ह्यातील कुलैथ गावातील महिलेवर हा अत्याचार झाला आहे. तिने एका व्यक्तीवर रेप केल्याचा आणि कार चालकावर आरोपीला सहकार्य केल्याचा आरोप केला आहे.

महिलेने सांगितले की, रामबाबू गुर्जर फॅक्टरीमध्ये काम देण्याच्या अमिषाने ग्वाल्हेरमध्ये प्राणीसंग्रहालयासमोरून तो मला आपल्या तवेरा गाडीतून घेऊन गेला आणि नंतर चालत्या गाडीत रेप केला. या दरम्यान ड्रायव्हर गाडी चालवत राहिला आणि मालक रेप करत होता. यानंतर तो हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि पुन्हा जबरदस्ती केली.

महिलेने पोलीस ठाण्यात जाऊन यासंबंधी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी आरोपी रामबाबू गुर्जर आणि त्याच्या ड्रायव्हरला अटक केली आहे.

डीएसपी क्राईम ब्रँच विजय भदौरिया यांनी सांगितले की, एका महिलेने सोमवारी तक्रार दाखल केली आहे की, तिच्यावर चालत्या कारमध्ये बलात्कार करण्यात आला आणि नंतर हॉटेलमध्ये नेऊन पुन्हा बलात्कार करण्यात आला. महिलेच्या तक्रारीवर प्रकरण नोंदवून आरोपींना अटक करण्यात आली आहे.