लग्नात DJ च्या गाण्यांवर ‘डान्स’ करत होती 7 वी मधील विद्यार्थीनी, गुंडाने केला ‘बलात्कार’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशात हमीरपूर जिल्ह्यात एका गुंडाने लग्नात डीजेवर डांस करणाऱ्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपी 7 वीच्या विद्यार्थीनीला मंगल कार्यालयात असलेल्या हॉलच्या मागे घेऊन गेला आणि त्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. एवढेच नाही तर आरोपीने विद्यार्थीनीना जीवानिशी मारण्याची धमकी दिली आणि तो फरार झाला.

नातेवाईकांच्या तक्रारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन मुलीला मेडिकल चाचणीसाठी पाठवले आणि आरोपीचा शोध सुरु केला आहे.

हमीरपूर जिल्ह्याचे एसपी श्लोक कुमार म्हणाले, सुमेरपूर पोलीस ठाण्याजवळ एका मंगल कार्यालयाच्या हॉलमागे रात्री विवाहाचा सोहळा होता, ज्यात सातवीत शिकणाऱ्या डीजेच्या गाण्यावर मुलगी डांस करत होती, तेव्हा तिथे येऊन एका मध्यम वयाच्या गुंडाने तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने मंगल कार्यालयामागे नेले आणि शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला, यानंतर पीडितेला जीवानिशी मारण्याची धमकी देऊन तो फरार झाली.

पीडितेने मंगल कार्यालयाच्या हॉलवर पोहोचून आपल्या आईला या घटनेची माहिती दिली. हा धक्कादायक प्रकार ऐकून आई मुलीला घेऊन सुमेरपूर पोलीस ठाण्यात पोहोचली आणि आरोपीच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पीडितेला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवले. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.