पिंपरीत मंदीरामध्येच लहान मुलीवर बलात्कार; आरोपीला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

मंदीरामध्ये खेळत असताना आठ वर्षाच्या मुलीवर मंदीरात बलात्कार केल्याची घटना पिंपरीत घडली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता आरोपीला सोमवार (दि.१८) पर्य़ंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हा प्रकार खराळवाडीतील एका मंदीरात शनिवारी (दि.९) सकाळी साडेअकरच्या सुमारास घडला होता.

रोहन दिलीप भांडेकर (वय-१८, रा. खराळवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांची ८ वर्षांची पीडित मुलगी शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास खराळाडीतील एका मंदीरात खेळत होती. आरोपीने तिला मंदीरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. घडलेला प्रकार मुलीने आईला सांगितला. आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन रविवारी (दि.१०) पिंपरी मधून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सोमवार (दि.१८) पर्य़ंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गजानन काडाळे करीत आहेत.