Rape in Jalna | जालन्यात शाळकरी मुलीला फरफटत नेत केला बलात्कार

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात मागील काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या (Crime against women) घटनांमध्ये वाढ होत आहे. पुणे, मुंबई यासारख्या शहरांमध्ये घडलेल्या बलात्कारांच्या घटनांमुळे राज्यसह देश हादरुन गेला आहे. यानंतर ठाणे, अमरावती या शहरांमध्ये बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर आता जालना जिल्ह्यात (Rape in Jalna) देखील अशीच एक खळबजनक घटना घडली आहे. जालना जिल्ह्यात (Rape in Jalna) एका शाळकरी मुलीला (minor school girl) केसांना पकडून फरफटत नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले आहे.

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील देवगाव (Devgaon taluka Badnapur) याठिकाणी एका शाळकरी मुलीवर शेजारी राहणाऱ्या तरुणानं बलात्कार केला. पीडित शाळकरी मुलगी आपल्या घरासमोर कोंबड्यांना दाणे टाकत असताना, नराधमाची तिच्यावर नजर पडली. त्यानंतर आरोपीने त्या मुलीला जबरदस्तीने उचलून नेत तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात (Badnapur Police Station) संशयित आरोपीविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

अनवर खान कादर खान पठाण (Anwar Khan Kadar Khan Pathan) असं संशयित आरोपीचे नाव असून तो देगावचा रहिवासी आहे. घटनेच्या दिवशी म्हणजे मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास पीडित मुलगी आपल्या घरासमोर कोंबड्यांना दाणे टाकत होती. दरम्यान आजूबाजूला कोणी नसल्याची संधी साधून पीडित मुलीचे केस धरुन तिला ओढत आपल्या घरात नेले. त्याठिकाणी मुलीवर बलात्कार केला.

पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला.
त्यांनी बदनापूर पोलीस ठाण्यात धाव घेत संशयित आरोपी विरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी आरोपीवर पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Titel :- Rape in Jalna | minor school girl raped while holding her hair in jalna

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Diabetes | 7 दिवसात डायबिटीज कमी करू शकते ‘हे’ विशेष फळ, पुण्यातील डॉ. उन्नीकृष्णन आणि ‘श्रीकाकुलम’चे डॉ. राव यांचे संशोधन

Aadhaar verify | घरबसल्या ऑनलाइन व्हेरिफाय होईल ‘आधार’, फॉलो करा ‘ही’ सोपी प्रोसेस

Pune Crime | सोसायटीच्या वर्गणीवरुन दोन कुटुंबात तुफान राडा, 5 जणांवर FIR