खळबळजनक ! चुलत्याकडून चिमुरडीवर अत्याचार करून खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – अपहरण, लैंगिक अत्याचार करुन अडीच वर्षाच्या चिमुरडीचा खून करणाऱ्या मुलीच्या सख्ख्या चुलत्याला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.

सांगवी परिसरात पीडित बांधकाम कामगार कुटुंब राहते. पत्र्याचा आडोसा केलेल्या खोलीवजा घरात हे कुटुंब राहत आहे. मंगळवारी पहाटे अज्ञात आरोपीने अर्धवट उघड्या असलेल्या या घरात प्रवेश केला. अडीच वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण केले. तिच्याशी लैंगिक अत्याचार करुन गळा आवळून खून केला. चिमुकलीचा मृतदेह सांगवी येथील मिलिटरीच्या परिसरात पाण्याने भरलेल्या नाल्यात टाकून दिला.

पालकांनी सांगवी पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांच्या पथकाने मुलीचा शोध सुरु केला असता सांगवी येथील मिलिटरीच्या परिसरात मुलीच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका नाल्यामध्ये तिचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदन अहवालात तिच्यावर अमानुषपणे लैंगिक अत्याचार करून गळा आवळून ठार मारल्याचे समोर आले. तपास सांगवी पोलिस करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –