पतीच्या मित्राने आणि त्याच्या मित्राने केला आळी-पाळीने बलात्कार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – नोकरी लावण्याचे अमिष दाखवून, एका हॉटेल मध्ये नेऊन पतीच्या मित्राने महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर त्याच्या मित्राने बलात्कार केला. तेथून मापसा, गोवा येथे नेवून तेथेही बलात्कार केला आणि कात्रज रस्त्यावर सोडून दिले. हा प्रकार बावधन, गोवा ते कात्रज येथे 1 ते 3 जुलै दरम्यान घडला.

या प्रकरणी पीडित 25 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. तर विवेक भोगील (रा. हडपसर) याला अटक केली आहे. विष्णु व अतुल यांच्यावर गुन्हा दाखल केला असून ते अद्याप फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीचा मित्र अतुल याने तिला नोकरीचे आमिष दाखवले. तिला रिक्षात बसवून बावधन येथील एका हॉटेल मध्ये नेले. तिथे अतुल आणि त्याच्या मित्राने आळी पाळीने बलात्कार केला. तेथून तिला मापसा, गोवा येथे नेवून तिथेही बलात्कार केला आणि पुन्हा कात्रज येथे आणून सोडले.

याबाबत हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर एकाला अटक करण्यात आली असून तपास सुरु आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like