‘रिम्स’च्या ‘कोरोना’ वार्डात ड्यूटीवरील डॉक्टरवर बलात्काराचा प्रयत्न, आरोपी सीनियर डॉक्टर फरार

रांची : झारखंडच्या रिम्स हॉस्पिटलमधून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. येथे एका सीनियरने ज्युनियर महिला डॉक्टरवर रेप करण्याचा प्रयत्न केला. महिला डॉक्टरने यासंबधीची तक्रार पोलिसात दाखल केली आहे. बिरायतू पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सध्या आरोपी डॉक्टर फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

आरोपी डॉक्टर झाला फरार

राज्यातील सर्वात मोठे हॉस्पिटल असलेल्या रिम्समध्ये अ‍ॅनेस्थेसिया विभागाची ज्युनियर डॉक्टर रात्री कोविड वार्डात ड्युटी करत होती. क्रिटिकल केयरच्या एका सीनियर डॉक्टरची सुद्धा तेथे ड्यूटी होती. महिला डॉक्टरने आरोप केला आहे की, 27-28 मे रोजी रात्री ड्यूटीच्या दरम्यान या सीनियर डॉक्टरने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पीडित महिला डॉक्टरने याची माहिती प्रथम रिम्सचे डायरेक्टर डॉक्टर डीके सिंह यांना दिली.

कोविड वार्डात ड्यूटीवर होती डॉक्टर

याप्रकरणी डायरेक्टर डॉक्टर डीके सिंह यांनी म्हटले की, पीडित डॉक्टर कोविड वार्डात काम करत होती. तिने लेखी स्वरूपात याची तक्रार दिली आहे. आरोपीविरूद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. याशिवाय त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास मदत केली.

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

याप्रकरणी सिटी एसपी सौरभ कुमार यांनी म्हटले की, तात्काळ अ‍ॅक्शन घेऊन तक्रार दाखल केली आहे. आरोपी डॉक्टरच्या अटकेसाठी लागोपाठ छापेमारी सुरू आहे. पोलिसांनी बलात्काराचे 376 कलम लावले आहे. पीडितेचा जबाब कलम 164 अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like