जत तालुक्यात गतिमंद मुलीवर बलात्कार

माडग्याळ : पोलीसनामा ऑनलाईन

जत तालुक्यातील संख येथील एका मुलीवर गतिमंद असल्याचा गैरफायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने तीच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पिडित गतिमंद मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संखचे पोलीस पाटील सुरेश पाटील यांनी उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

[amazon_link asins=’B01G56E0E4,B01MR6OKR0′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4f6e7962-b5dd-11e8-a276-9d7eb80d12bd’]

ही घटना उघडकीस आल्यानंतर उमदी पोलिसांनी हे कृत्य कोणी केले याचा तपास करीत आहे. मात्र, उमदी पोलिसांकडून या प्रकरणी गुप्तता पाळली आहे. याबाबत उमदी पोलीसात अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर जतच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली होती.अद्याप यामध्ये किती जणांचा सहभाग आहे. याचा तपास पोलीस करीत आहेत.मुलगी गतिमंद असल्यामुळे तपास करण्यास विलंब होत आहे. अधिक तपास उमदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे हे करीत आहे.

दरम्यान, घटना समजल्यानंतर गावातील काही जणांनी हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. पण प्रकरण मिटवण्यात अपयश आल्याने पोलीस ठाण्यापर्यंत हे प्रकरण आल्याने गुन्हा नोंद झाला आहे. संखमध्ये 9 जुलै रोजी युवतीवर बलात्कार करून खुन करण्यात आला होता. आता दुसरी बलात्काराची घटना उघडकीस आल्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी