इन्स्टाग्रामवरुन ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तिच्यावर बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – इन्स्टाग्रामवरुन ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडीत मुलीच्या बहिनीने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरबाज नदाफ (रा. कोंढवा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिनीचे इन्स्टाग्रामवर खाते आहे. इन्स्टाग्रामवरून आरोपीची पीडीत मुलीसोबत ओळख झाली. तो तिच्याशी दररोज चॅटींग करू लागला. आरोपीने पीडीत मुलीला लग्नाचे आमिष दाखवून विविध ठिकाणी घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला. लॉकडाउनमध्ये आरोपी हा त्याच्या मूळगावी सोलापूरला गेला. या नंतर मुलगी सात महिन्याची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार तरुणीच्या बहिनीला समजला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. अधिक तपास खडक पोलिस करत आहेत.