टॅटू काढण्याच्या बहाण्याने गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

टॅटू काढण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे आैषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तसेच आरोपीने पीडीतेचा अश्लील व्हिडिअो तयार करुन ब्लॅकमेल करत अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडीतेने केला आहे. याबाबत 35 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीच्या विरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रशांत श्रीवास्तव असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही घटस्फोटीत असून ती आपल्या मुलीसह धायरी परिसरात राहते. आरोपीचे याच परिसरात मेडिकलचे दुकान आहे. पीडीत महिला ही त्याच्या दुकानासमोर कार उभा करत असे. त्यामधून या दोघांची अोळख झाली.आरोपी मेडिकल चालविण्यासोबत टॅटू आर्टिस्ट म्हणूनही काम करतो. फिर्यादी महिलेने आरोपीला टॅटू काढण्यास सांगितले. सुमारे एक वर्षापूर्वी ती मेडिकलमध्ये टॅटू काढण्यासाठी गेली होती. त्यावेळी टॅटू काढत असताना त्रास होत असल्यामुळे आरोपीने पेनकिलरचे आैषध देण्याच्या बहाण्याने तिला गुंगीचे आैषध दिले. महिला बेशुद्ध झाल्यावर तिच्यावर आत्याचार केला. याप्रकरणाची कोणासमोर वाच्यता केली तर तुझा अश्लील व्हिडीअो तयार केला असून तो सोशल मिडियावर व्हायरल करेन अशी धमकी दिली. त्यानंतर अनेकदा आरोपीने पीडीतेला स्वतःच्या दुकानात, फिर्यादीच्या घरी व लाॅजवर नेऊन वारंवार अत्याचार केले.

आरोपीने काही दिवसापूर्वी तिला भेटायला बोलावून घेतले. मात्र तिने नकार दिल्यामुळे त्याने चिडून त्याच्या अनेक मित्रांना फिर्यादी महिलेचे फोटो व मेसेज पाठवून तिची बदनामी केली. त्याच वेळी दुसऱ्या महिलेसोबत पतीचे अनैतिक लैंगिक संबंध असल्याची माहिती आरोपीच्या पतीला मिळाली. याचा फायदा घेत तिनेही पीडीतेला ब्लॅकमेल करुन गर्भपाताच्या गोळ्याची विक्री करायला लावले. एेवढेच नाही तर पती विरोधात तक्रार दिल्यास तुझी सुपारी देवून जीवे मारेन अशी धमकी दिली. या संपूर्ण प्रकारामुळे आरोपीची पत्नी अर्चना श्रीवास्तव हिच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन खोडद करत आहेत.