पुण्यातील ‘BPO’ कर्मचार्‍यावरील सामूहिक बलात्कार, हत्याप्रकरणातील आरोपींच्या फाशीला उच्च न्यायालयाकडून स्थगिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील गहुंजे येथे ‘बीपीओ’ कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणात आरोपींना पुणे न्यायालयाने फाशिची शिक्षा सुनावली होती. पुणे न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध दोन दोषींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पुणे न्यायालयाने २४ जून रोजी त्यांना फाशी देण्यात येणारी फाशी रद्द करून जन्मठेप देण्याची विनंती दोषींनी केली होती. यावर उच्च न्यायालयाने दोषींची फाशी पुढे ढकलली आहे.

पुण्याच्या येरवडा कारागृहात असलेल्या पुरुषोत्तम बोराटे आणि प्रदीप कोकाडे या दोघांना पुणे सत्र न्यायालयाने १० एप्रिल रोजी वॉरंट काढत त्यांना फाशी देण्याची तारीख निश्चित केली होती. त्यानुसार त्यांना २४ जून रोजी फाशी दिली जाणार होती. दोषींनी उच्च न्यायालयात धाव घेत फाशी रद्द करण्याची विनंती केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने दोषींची फाशी पुढे ढकलली. तसेच पुढील निर्देश येईपर्यंत शिक्षेची अंमलबजावणी न करण्याचे हायकोर्टाने निर्देश दिले आहेत.

पुणे सत्र न्यायालयाने मार्च २०१२ मध्ये दोघांनाही या प्रकरणी दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची शिक्षा २०१५ मध्ये कायम ठेवली होती. एप्रिल २०१६ मध्ये राष्ट्रपतीनीही दोघांचा दयेचा अर्ज फेटाळला होता.

घटनेदिवशी नेमके काय घडले ?
ज्योतीकुमार चौधरी या विप्रो बीपीओमध्ये काम करीत होती. १ नोव्हेंबर २००७ रोजी तिचा नोकरीचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी पुरुषोत्तम बोराटे ज्योतीकुमार हिला घरातून ऑफिसला घेऊन जाण्यासाठी आला होता. त्याच्याबरोबर त्याचा मित्र प्रदीप कोकाडे हा देखील होता. ज्योतीकुमारी चौधरीला घरातून घेतल्यावर दोघांनी गाडी गहुंजे गावातील निर्जन स्थळी नेली. तिथे त्यांनी ज्योतीकुमारी हिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचा खून करण्यात आला. हे सगळे झाल्यावर दोघेही दुसऱ्या कर्मचाऱ्यांना घेण्यासाठी निघून गेले. गाडीचा टायर पंक्चर झाल्यामुळे आपल्याला येण्यास उशीर झाला, असे बोराटे याने कंपनीमध्ये सांगितले. ज्योतीकुमारीचा खून झाल्याचे उघड झाल्यावर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी दोघांनाही अटक केली होती.

आरोग्यविषयक वृत्त-
भारतातील ‘या’ ७ योगगुरूंचे जगभरात ‘फालोअर्स’, जाणून घ्या त्यांच्याबद्दल
लहान मुलांनाही शिकवा ही “योगासन” होतील फायदे
लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय
मानसिक आरोग्य जपण्यासाठी झोप आहे महत्वाची