संतापजनक ! 10 वर्षीय मुलीवर 7 जणांकडून बलात्कार

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – एका 10 वर्षीय मुलीवर 7 जणांनी बलात्कार (rape) केल्याची संतापजनक घटना हरियाणामध्ये उघडकीस आली आहे. हरियाणाच्या रामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे यातील 6 मुले ही अल्पवयीन आहेत. आरोपींनी या घटनेचा व्हिडीओ बनवून तो काहींच्या व्हॉट्सॲपवर पाठवला होता. व्हायरल झालेला व्हि़डीओ पीडितेच्या वडिलांनी पाहिल्यानंतर माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

व्हिडीओ पाहताच पीडीत मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणामधील रेवाडीच्या रामपुरा पोलीस ठाणाच्या हद्दीत 24 मे रोजी ही घटना घडली आहे. मुलगी घराजवळच असलेल्या शाळेच्या मैदानात खेळत होती. त्यावेळी आजूबाजूला असलेल्या या मुलांनी तिला पकडून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे हे कृत्य करणारी मुले ही 8 ते 14 वर्षे वयोगटातील असून यातील एकजण 18 वर्षांचा आहे. तसेच त्यांनी या घटनेचा व्हिडीओ देखील शूट केला होता. आरोपींनी शूट केलेला व्हिडीओ काही जणांना पाठवला होता.
तिथूनच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून कसून चौकशी सुरू आहे.
पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हे देखील वाचा

 

महापौरांचे पती आणि आरएसएस प्रचारक 20 कोटींचं कमिशन मागताना कॅमेर्‍यात कैद, व्हायरल सीडीमुळं प्रचंड खळबळ

 

‘एरियल योग’ माहित आहे का ? मसल्स, खांदे आणि स्पाइन होईल मजबूत

 

सहकारी महिला डॉक्टरचा छळ करणार्‍या वरिष्ठ डॉक्टराला नातेवाईकांनी अक्षरशः तुडवलं; कोल्हापूर जिल्ह्यातील घटना

 

Mask for Dandruff and Hairfall | केस गळती असो की मग कोंडा, अक्रोड पासून बनलेली DIY हेअर मास्क एकदम उपयुक्त, जाणून घ्या

 

महंत नरसिंहानंद यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, म्हणाले – ‘कोरोना मोठं षडयंत्र, मुस्लिमांची वाढती लोकसंख्या विनाशाचे कारण, प्रत्येक हिंदूने 5-6 मुलांना जन्म द्यावा’

 

Vitamin C Side Effects : इम्यूनिटी वाढवण्यासाठी व्हिटॅमिन-C चा करा संतुलित वापर, होऊ शकतात ‘हे’ 5 साईड इफेक्ट, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  rape on 10 years old girl by 7