संतापजनक ! घरात एकट्या असलेल्या 8 वर्षाच्या मुलीवर ‘लैंगिक’ अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – घरात एकटी असल्याचे पाहून आत शिरुन ८ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार करण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वाकड पोलसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. सोमनाथ दत्तात्रय चव्हाण (वय ३०, रा. पुनावळे) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ३२ वर्षाच्या महिलेने वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

या महिलेची ८ वर्षाची मुलगी घरात एकटी होती. ६ जानेवारीला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही मुलगी एकटी असल्याचे पाहून सोमनाथ चव्हाण हा घरात शिरला. त्याने आतून घराचा दरवाजा बंद केला. त्यानंतर त्यांच्या मुलीचे कपडे काढून तिच्यावर अत्याचार केला.

ही महिला घरी आपल्यावर मुलीने हा सर्व प्रकार आईला सांगितला. त्यानंतर त्यांनी वाकड पोलिसांकडे धाव घेतली. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/