माणूसकीला काळीमा फासणारी घटना ! पुण्यात नराधमाने केला 2 चिमुरडींवर अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शेजारी राहणाऱ्या साडेतीन आणि साडेचार वर्षांच्या चिमुकल्या मुलींवर एका ५५ वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची माहिती अशी, कोथरुडमधील सुतारदरा परिसरात एका ५५ वर्षाच्या नराधमा शेजारी दोन लहान मुली घरात होत्या. घरात मोठे कोणी नाही हे पाहून त्याने त्या दोन लहान मुलींवर अत्याचार केला. हा प्रकार या मुलींचा नातेवाईक असलेल्या ५ वर्षाच्या मुलाने पाहिला. सायंकाळी या मुलींची आई आल्यावर या मुलाने या मुलींसोबत शेजाऱ्याने केलेल्या प्रकाराची माहिती दिली. या महिलेने त्याला जाब विचारल्यावर त्याची घाबरगुंडी उडाली. महिलेने आम्ही पोलिसांकडे तक्रार करतो, असे सांगितल्यावर तो पळून गेला. कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरु केला आहे.

You might also like