पुरंदरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाईन – एका १३  वर्षांच्या शाळकरी मुलीवर ५५ वर्षांच्या नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोडीत येथे ही घटना घडली आहे.

कोडीत येथे एक कुटुंब मेंढ्या चारण्यासाठी पाल टाकून उतरले होते. गेल्या १० जूनला सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास कुटुंबातील १३ वर्षांची मुलगी पालाबाहेर खेळत होती. याच सुमारास आरोपी राजू बडदे हा तेथे दुचाकीवरून आला. त्याने शेतातून स्प्रिंकलर मशीन आणायचे आहे. मशीन धरून बसण्यासाठी तू माझ्याबरोबर चल, असे सांगत या मुलीला दुचाकीवरून शेतात घेऊन गेला. शेतात गोठ्यावर दुचाकी उभी करून तिला शेजारच्या चारीत स्प्रिंकलर मशीन आहे, ती घेऊन यायला सांगितले. ती चारीत गेल्यानंतर आरोपीने तिच्या पाठीमागे जाऊन तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला कोणाला सांगितलंस तर मारून टाकीन, अशी धमकी दिली. नंतर पीडित मुलीला पालाजवळच्या रस्त्यावर सोडून दिले.

घाबरलेल्या या मुलीने आपल्या घरी बहीण व आईला हा घडलेला प्रकार सांगितला. मुलीचे वडील बाहेरगावी गेले असल्याने घाबरून त्यांनी कोणाकडे ही याची वाच्यता केली नाही. गुरुवारी सायंकाळी वडील घरी आल्यानंतर त्यांना झाला प्रकार सांगितला. वडिलांनी मुलीला घेऊन थेट सासवड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. सासवड पोलिसांनी आरोपी राजू बापूराव बडदे (वय- ५५, रा. कोडीत, पुरंदर) याला अटक केली आहे. आरोपीच्या विरोधात बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

सिनेजगत

आमिर खानची मुलगी इरा खानने केला ‘डेटींग’बाबत मोठा ‘गौप्यस्फोट’ !

‘असे’ काय केले सारा अली खानने की, चाहते म्हणाले,’लाल मिरची’

#Video : म्हणून रस्त्यावर चालत होती जान्हवी कपूर, पाहून चाहते झाले चकित…

सिंगर नेहा भसीनने शेअर केले तिचे ‘हॉट’ फोटो अन् पहाता-पहाता सोशलवर धुमाकूळ