धक्कादायक ! शाळेच्या स्वच्छतागृहात विद्यार्थ्याकडूनच विद्यार्थीनीवर अत्याचार

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – बारामती शहरातील एका माध्यमिक शाळेतील १३ वर्षीय विद्यार्थीनीवर तिच्यासोबत शिकणाऱ्या एका विद्यार्थानेच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रविवारी सकाळी हा प्रकार शाळेच्या स्वच्छतागृहात घडला. याप्रकरणी पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका माध्यमिक विद्यालयात पिडीत विद्यार्थीनी शिकण्यास आहे. तिच्यासोबत शिकणाऱ्याच एका विद्यार्थ्याने तिच्यावर २८ एप्रिल रोजी शाळेच्याच स्वच्छता गृहात नेऊन अत्याचार केले. त्याला आणखी एका विद्यार्थ्याने साथ दिली. असे तिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तिने आज दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी शेंडगे करत आहेत.