अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमास दहा वर्षांची शिक्षा

माण : पोलीसनामा ऑनलाईन – येथील शिंदे वस्तीवरील कडवळ्याच्या शेतात दि. ४ जुलै २०१५ रोजी अल्पवयीन मतिमंद मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करणारा नराधम धनाजी आप्पासाहेब शिंदे (वय ३०, रा. शिंदे वस्ती, पाचवड) यास वडूजचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे यांनी दहा वर्षे शिक्षा आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

याबाबत माहिती अशी, पाचवड, ता. माण येथील शिंदे वस्तीवर आरोपी धनाजी आप्पासाहेब शिंदे (वय ३०) याने त्याची नातलग असलेल्या अल्पवयीन मतिमंद मुलीवर दि. ४ जुलै २०१५ रोजी कडवळ्याच्या शेतात जबरदस्तीने अत्याचार केल्या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अविनाश वणवे यांनी या गुन्ह्याचा तपास करून वडूज सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने नऊ साक्षीदार तपासण्यात आले. सहाय्यक जिल्हा सरकारी वकील अजित कदम व सहाय्यक सरकारी वकील नितीन गोडसे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश मलाबादे यांनी आरोपी धनाजी आप्पासाहेब शिंदे यास भादंवि कलम ३७६ आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३,४,५,६,७,८ अन्वये दहा वर्षे सक्तमजुरी व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

पीडित व्यक्तीस वीस हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. या कामी प्रॉसिक्युशन स्कॉडचे हवालदार दत्तात्रय जाधव, नानासाहेब कारंडे, सहाय्यक फौजदार गोसावी, अक्षय शिंदे, सत्यम पाटील, स्वप्निल म्हामणे यांनी सहकार्य केले.

सिनेजगत

‘रॅपर’ हनी सिंगचे ‘हे’ गाणे धुमाकूळ घालणार

ब्रेकअपनंतर अशी झाली होती शाहिद कपूरची ‘हालत’

दिशा पाटनीच्या बर्थ डे पार्टीत ‘तशा’ अवतारात आला टायगर श्रॉफ ; फोटो व्हायरल

‘या’ आहेत बॉलिवूडच्या टॉप ‘५’अ‍ॅक्ट्रेस ज्यांना तुम्ही ओळखू शकणार नाहीत

 

 

 

You might also like