तब्बत 7 वर्षे अल्पवयीन मुलीवर पित्याकडून अत्याचार

अहमदनगर : पोलिसनामा आँनलाईन – सावत्र वडिलांनी तब्बत 7 वर्षे शारीरिक अत्याचार केल्याची फिर्याद 13 वर्षांच्या मुलीने पोलिसांत दिली आहे. त्यावरून सावत्र पित्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात ‘पोक्सो’ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलगी ही तिच्या सावत्र वडिलांकडे राहते. 7 वर्षांपासून पित्याकडून सावत्र मुलीचे लैंगिक शोषण सुरू होते. सदर प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली जात होती. भीतीपोटी पीडित अत्याचार सहन करीत होती. बुधवारी (दि. 20) रात्री सदर मुलीवर शारीरिक अत्याचार केला होता. त्यामुळे तिचा रक्तस्त्राव झाला होता. अत्याचार करतेवेळी पीडितेच्या ओरडण्याचा आवाज कोणालाही जाऊ नये, यासाठी तिचे तोंड कापडाने बांधून अत्याचार केला जात होता.

पीडित मुलीने शुक्रवारी दुपारी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून नराधम पित्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.