जामखेडमध्ये अल्पवयीन मुलीवर ‘बलात्कार’

जामखेड : पोलीसनामा ऑनलाइन – शेतात जाणार्‍या अल्पवयीन मुलीला अडवून भावाच्या मदतीने तिच्यावर अत्याचार केल्यापृकरणी दोघांविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेत अल्पवयीन मुलगी दीड महिन्यांची गर्भवती राहिली आहे. विजय उर्फ दादा पोपट घुगे (वय 21 वर्षे. रा. आनंदवाडी ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलगी शेतात जात असताना आरोपी घुगे याने स्वतःच्या भावाच्या मदतीने तिला अडविले. त्यानंतर मुलीवर अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या भावांना मारुन टाकीन अशी धमकी दिली. त्यामुळे भीतीपोटी मुलीने दोन महीने होऊनही हा प्रकार कोणाला सांगितला नाही. त्यानंतर तीन दिवसांपुर्वी पीडित मुलगी घरात रडत होती. तिला आईने का रडते असे विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला. यानंतर मुलीस जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी नेले.

त्यावेळी पीडित अल्पवयीन मुलगी दीड महिन्यांची गर्भवती आसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या नंतर दि 13 मार्च रोजी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीच्या भावासह दोन जणांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.