संतापजनक ! शाळेच्या आवारात ३.५ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – आई सोबत कामावर गेल्यानंतर शेजारी खेळणाऱ्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला बाजूला नेऊन शाळेच्या आवारात एका २५ वर्षीय तरुणाने चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार रविवारी दुपारी वाडी येथे घडला. याप्रकरणी तरुणाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर तरुण फरार झाला आहे.

भुषण दहाट (वय २५) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

मोलमजूरीसाठी आई वडिल गेले होते कामाला

पिडित मुलीचे आईवडिल फुटाळा वस्तीत राहण्यास आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे वडिल मोलमजूरी करतात तर आई धुणी भांडी करते. दरम्यान तिला घरात सांभाळणारे कुणी नाही. त्यामुळे आई तिला सोबत घेऊन जाते. रविवारी दुपारी तिला आई आपल्या सोबत अमरावती रोडवरील कॅम्पसजवळच्या काचीमेट परिसरात घेऊन गेल्या. त्यांतर ती काही धुणी भांडी करण्यासाठी गेली. तेव्हा तिने मुलीला शेजारी सोडले. ती समवयीन मुलांसोबत खेळत होती. त्यावेळी भूषण दहाट तेथे आला.

भूषण सिक्यूरिटी गार्ड

भुषण दहाट याची बहिण शाळेत काम करते. तर वडिल शेजारील अपार्टमेंटमध्ये नोकरी करतात. भुषण हा देखील सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो. तो तेथे आला. इतर मुलांना त्याने हुसकावून लावले. त्यानंतर पिडीत मुलीला घेऊन तो शेजारील शाळेत गेला. तेथे तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर तिला तेथेच सोडून तो पसार झाला.

वेदनांमुळे पुढे आला धक्कादायक प्रकार

पिडीत मुलीची आई काम आटोपून बाहेर आले. त्यानंतर मुलीला घेऊन ती घरी गेली. मात्र सायंकाळी मुलीचा वेदना होत असल्याने ती ओऱडू लागली. त्यानंतर हा प्रकार समोर आला.

ओळखीचा फायदा घेऊन केले कृत्य

चिमुकली मुलगी नेहमीच आईसोबत तेथे जात असल्याने ती दहाटला ओळखत होती. तिने आईला घडला प्रकार सांगितला. तिने दहाट याचे नावही सांगितले. त्यानंतर महिलेने पोलिसांत धाव घेतली.

आरोग्य विषयक वृत्त –

गूळ-फुटाणे स्नायूंच्या मजबुतीसाठी आहेत फायदेशीर

मासिक पाळीची अनियमितता, ‘हे’ आहेत उपाय

डँड्रफ मुळापासून नष्ट करा; शॅम्पूमध्ये हे मिसळा

भात खाल्ल्याने वजन वाढते; खरं आहे का ?

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like